breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मनसेच्या कार्यक्रमात स्टेज कोसळला; राज ठाकरे बचावले

मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गोरेगावमधल्या कार्यक्रमादरम्यान कार्यक्रमाचा स्टेज कोसळला. या दुर्घटनेत राज ठाकरे यांच्यासह इतर कोणालाही दुखापत झालेली नाही. आज शिवजयंती आणि मनसे शाखेचे उद्घाटन करण्यासाठी राज ठाकरे गेले होते. त्यादरम्यान कार्यक्रम सुरू असताना अचानक स्टेज कोसळला. स्टेजवर कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झाली होती. जास्त गर्दी झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर राज ठाकरे पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.

गोरेगावमध्ये आज मनसेचा शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम होता. याच दरम्यान स्टेजवर अनेक मनसैनिकांनी गर्दी केली होती. स्टेजची क्षमता कमी असल्याने हा स्टेज अचानक खाली कोसळला. त्यानंतर गोंधळ उडाला. या दुर्घटनेदरम्यान धक्काबुक्की करण्यात आल्याचे काही पत्रकारांनी म्हटले आहे. स्टेज कोसळल्याचा राग पत्रकारांवर काढण्यात आल्याचा आरोप काही पत्रकारांनी केला आहे. मात्र मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, इतर पक्षाचे कार्यकर्ते गर्दीत घुसले होते. त्यांचा आम्ही शोध घेत आहोत. दुर्घटनेबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

चांदिवली येथे मनसे शाखेचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी कार्यक्रमात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे साजरी करतो. याचा अर्थ आज ती साजरी करू नये असा होत नाही. महाराजांची जयंती एक दिवस नव्हे तर वर्षाचे 365 दिवस साजरी करावी असे त्यांचे कर्तृत्व आहे. आज शिवजयंती आहे. मनसे पक्ष शिवजयंती तिथीने साजरी करतो. याचे कारण म्हणजे आपल्याकडे दिवाळी , गणपती हे सण तिथीने येतात. गणपती गेल्यावर्षी कोणत्या तारखेला आले ते यावर्षीही त्याच तारखेला येतील असे नाही. आज व्यासपीठावर भाषणासाठी नाही तर तुमचे दर्शन व्हावे यासाठी आलो आहे. अशी साद त्यांनी मनसैनिकांना घातली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button