breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

आदित्य ठाकरेंची ‘ती’ एक कृती आमदारांच्या जिव्हारी; शिवसेनेतील बंडाची ठिणगी रायगडमध्ये

रायगडः शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळं राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना नेत्यांनी शिवसेनेने महाविकास आघाडीमधून बाहेर पडून भाजपसोबत युती करीत नवे सरकार स्थापन करावे असा प्रस्ताव दिला शिवसेना पक्ष नेतृत्वाला दिला आहे. राष्ट्रवादीकडून गळचेपी होत असल्याचा आरोप करत शिवसेना नेत्यांनी हे बंड पुकारले आहे. मात्र, या बंडाची ठिणगी काही महिन्यांपूर्वीच रायगडमध्ये पडली असल्याची चर्चा आहे. आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते तटकरे कुटुंबाकडे स्नेहभोजन केल्यामुळं शिवसेनेचे आमदार नाराज झाले आणि आमदार आणि आदित्य यांचे संबंध ताणले गेले.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर काही काळातच सरकारमधील कुरबुरी समोर येऊ लागल्या. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांच्याकडून शिवसेनेला त्रास होत असल्याचा आरोप रायगडमधील शिवसेना आमदारांकडून होत होता. आमदार भरत गोगावले यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे थेट तक्रार देखील केली होती. ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्नही फसला.

शिवसेना आमदारांच्या तक्रारी वाढत होत्या मात्र तरीही पक्षनेतृत्वाकडून दखल घेतली जात नसल्याचं आमदारांमध्ये नाराजी होती. आमदारांना विकासकामांसाठी निधी मिळत नाही. आमदारांचे श्रेयही पालकमंत्री घेतात. रायगडच्या पालकमंत्र्यांकडून दुजाभावाची वागणूक मिळत असल्याची तक्रार आमदारांकडून होत होता. रायगडमधीली तीन आमदार भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी हे या तक्रारी घेऊन मातोश्रीच्या दारात पोहोचले होते. मात्र, पक्षनेतृत्वाने या आरोपांची दखल घेतली नसल्याचं बोललं जात आहे. आमदारांच्या मनात राष्ट्रवादीबाबत खदखद असताना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या एका कृतीने आमदारांच्या मनातील असंतोष अधिक वाढला. आदित्य ठाकरे हे रायगड दौऱ्यावर असताना त्यांनी आमदारांच्या तक्रारींवर तोडगा निघेल असा विश्वास आमदारांना होता. मात्र, हे व्यासपीठ तक्रारीचे नाही, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एक प्रकारे तक्रारींकडे दुर्लक्ष केलं. व आपल्याच पक्षाच्या आमदारांचा अपमान केला, अशी भावना आमदारांमध्ये आहे.

इतकंच नव्हे तर, रायगडमधील मेळाव्यानंतर आदित्य ठाकरे तटकरेंच्या घरी स्नेहभोजनासाठी जाणार होते. मात्र, पदाधिकार्यांनी त्यांना तटकरेंकडे जाऊ नका कार्यकर्ते व संघटनेत चुकीचा संदेश जाऊ शकतो, अशी विनंती केली होती. मात्र, आदित्य यांनी या विनंतीला झुगारुन ते तटकरे यांच्या गीताबाग निवासस्थानी गेले. त्यावेळी परिवहनमंत्री आदित्य ठाकरेही त्यांच्यासोबत होते.आदित्य ठाकरेंची ही एक कृती पदाधिकारी आणि शिवसेना आमदारांच्या जिव्हारी लागली होती. यानंतर दोनच महिन्यात आमदारांनी बंड पुकारत पक्षनेतृत्वालाच आव्हान दिलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात रायगडचे तिन्ही आमदार सहभागी झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button