breaking-newsराष्ट्रिय

शहांच्या बॅंकेतील पैशाची चौकशी कोण करणार?

यशवंत सिन्हा यांचा सवाल 
वाराणसी – भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे संचालक असलेल्या अहमदाबाद सहकारी बॅंकेत नोटबंदीच्या काळात पहिल्या पाच दिवसांत साडे सातशे कोटी रूपये जमा झाले त्याची चौकशी कोण करणार असा सवाल माजी भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी केला आहे.

सरकारकडून ही चौकशी केली जाणार नाही कारण सर्व सरकारी यंत्रणा केंद्र सरकारच्याच इशाऱ्यानुसार चालत आहेत. ही इंदिरा गांधी यांनी 1975 साली आणलेल्या आणिबाणीपेक्षाही भीषण आणिबाणी आहे असे यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे. हे सरकार अन्य कोणत्याही व्यक्तीच्यासंबंधात चौकशीचा आदेश त्वरीत देते पण अमित शहा यांच्या बॅंकेमध्ये जमा झालेल्या या अब्जावधी रूपयांच्या रकमेविषयी ते कोणताही चौकशीचा आदेश देणार नाहींत असे ते म्हणाले. भाजप सरकारने देशाच्या घटनेची विटंबना केली असे हे सरकार देशाला मारक आहे असे त्यांनी म्हटले आहे.

आम आदमी पक्षाच्यावतीने येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेला त्यांनी फोन वरून संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले केवळ प्रशासकीय व्यवस्थेतच नव्हे तर न्यायालयीन व्यवस्थेतही या सरकारने घोळ घालून ती दुषित करण्याचा प्रयत्न केला आहे. या साऱ्या प्रकारांच्या विरोधात जनतेने आता रस्त्यावर उतरून लढा दिला पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button