breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाला अटक

मुंबई : शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर कालपासून व्हायरल होत आहे. याप्रकरणात मुंबई पोलिसांनी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय साईनाथ दुर्गे यांना अटक केली आहे. साईनाथ दुर्गे हे मुंबईबाहेर होते. सोमवारी सकाळी ते मुंबई विमानतळावर येताच दहिसर पोलिसांनी साईनाथ दुर्गे यांना ताब्यात घेतले.

‘मातोश्री’ या फेसबुक पेजवरुन शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा रोड शोमधील एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांच्या मुलाने याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. पोलिसांनी रविवारी रात्री कल्याणमधून विनायक डायरे या तरुणाला ताब्यात घेतले होते. यानंतर आता साईनाथ दुर्गे यांना अटक करण्यात आली आहे.

साईनाथ दुर्गे हे आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात. साईनाथ दुर्गे युवासेनेच्या कार्यकारिणीचे सदस्य होते. याशिवाय, त्यांनी मुंबई महानगरपालिकेतील शिक्षण समितीमध्ये काम केलं आहे. मातोश्री या फेसबुक पेजवरून शीतल म्हात्रे यांचा व्हिडीओ व्हायरल करण्यात त्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. साईनाथ दुर्गे हे सध्या दहिसर पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. आतापर्यंत या प्रकरणात चार ते पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button