breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती यांच्यासह दोन जणांवर गुन्हा दाखल

मुंबई – बांगलादेशी महिलेचा बचाव करणे देवेन भारती आणि दीपक फटांगरे यांना चांगलेच महागात पडले आहे. या बांग्लादेशी महिलेवर कारवाई न करण्याबाबत दबाव आणल्याच्या आरोपाखाली अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक फटांगरे आणि बांगलादेशी नागरिक रेश्मा खान या तिघांविरुद्ध पासपोर्ट आणि विदेशी नागरिक कायद्यांतर्गत मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाकडे सोपविण्यात आला आहे. माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक कुरुलकर यांच्या तक्रारीवर गुन्हा नोंदवण्यात आला.

चार वर्षांपूर्वी देवेन भारती हे मुंबई पोलीस दलात सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) आणि दीपक फटांगरे हे मालवणी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. याच दरम्यान बांग्लादेशी नागरिकांविरोधात कारवाई करणार्‍या आय शाखेचे पोलीस निरीक्षक दीपक कुरुळकर यांनी काही बांगलादेशी नागरिकांविरुद्ध मोहीम उघडली होती. या मोहिमेंतर्गत त्यांनी रेश्मा खान या महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिच्या चौकशीत ती बांगलादेशी असल्याचे उघडकीस आले होते. तिच्याकडे पोलिसांना एक भारतीय पासपोर्ट सापडला होता. हा पासपोर्ट तिने बोगस दस्तावेज सादर करुन मिळविला होता. त्यामुळे रेश्माविरुद्ध गुन्हा दाखल करुन तिच्यावर अटकेची कारवाई करण्याची विनंती दीपक कुरुळकर यांनी मालवणी पोलिसांकडे केली होती.

दीपक कुरुळकर यांनी निवृत्तीनंतर रेश्मा प्रकरणी माहिती अधिकारात माहिती मागवली. यावेळी त्यांना चार वर्षांनंतरही त्यांच्या अर्जावर काहीच कारवाई झाली नसल्याचे दिसले. देवेन भारती यांच्या आदेशावरुन ही कारवाई झाली नव्हती. त्यामुळे त्यांनी मालवणी पोलीस ठाण्यात पुन्हा तक्रार अर्ज करुन देवेन भारती, दीपक फटांगरे आणि रेश्मा खान यांच्याविरुद्ध गुन्हा करण्याची मागणी केली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button