breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

मुंबईतील प्रदूषणाबाबत अभिनेत्री केतकी माटेगावकरची पोस्ट; म्हणाली..

मुंबई : ध्या मुंबई आणि परिसरातील हवा अत्यंत वाईट असल्याची नोंद झाली आहे. देशातील प्रदूषित शहर अशीच ख्याती असलेल्या दिल्लीपेक्षाही मुंबईतील प्रदूषणाचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान, यावरून अभिनेत्री केतकी माटेगावकरने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून केतकीनं महापालिकेकडे प्रदूषणाबाबत गांभीर्याने विचार करावा, अशी विनंती केली आहे.

केतकीने पोस्टमध्ये लिहिलं की, मुंबई, ही गोष्ट गांभीर्याने विचारात घेण्याची गरज आहे, प्रदूषणात वाढ होत आहे! सर्वत्र लोकांना श्वासोच्छवासाचा त्रास, धुळीची ऍलर्जी आणि व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होत आहे. सुरू असलेली बांधकामे आणि इमारतींची कामे याकडे लक्ष देऊन खबरदारी घेणे आवश्यक आहे! जलस्त्रोतांजवळ कोणताही कचरा फेकण्याआधी विचार करावा. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती मी एक जागृत नागरिक म्हणून करत आहे.

हेही वाचा – राज्य सरकारचा मोठा निर्णय; SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र बंधनकारक

मुंबईतील प्रदूषण का वाढते आहे?

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मुंबईतील प्रदूषणाचे प्रमाण वाढत असल्याचे विविध संस्थांनी सादर केलेल्या अहवालांतून दिसते. दरवर्षी साधारणपणे थंडीची चाहूल लागताच मुंबईच्या हवेचा दर्जाही ढासळू लागतो. गेल्या वर्षी (२०२२) डिसेंबर, यंदा जानेवारी, फेब्रुवारीमध्ये मुंबईच्या हवेची स्थिती वाईट झाली ती अगदी मार्च अखेरपर्यंत होती. पावसाळ्यानंतर मुंबईतील वाऱ्यांची स्थिती बदलते, वेग मंदावतो. त्यामुळे हवेत साचलेली धूळ, प्रदूषके यांचा निचरा होत नाही. बाष्पामुळे धुलीकण हवेतच तरंगत राहतात. या नैसर्गिक कारणांबरोबच अनेक मानवनिर्मित कारणेही मुंबईच्या प्रदूषणात भर घालत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button