breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

आज पंतप्रधानांची नवीन वर्षातील पहिली ‘मन की बात’

नवी दिल्ली – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रेडियोवरील ‘मन की बात’ हा कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होतो. त्यानुसार आज जानेवारी महिन्याचा शेवटचा रविवार असल्याने पंतप्रधान सकाळी ११ वाजता ‘मन की बात’च्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे नवीन वर्षात होत असलेला हा पहिलाच मन की बात कार्यक्रम असून पंतप्रधानांनी शनिवारी ट्विट करत नागरिकांना आजचा हा कार्यक्रम ऐकण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकरी ट्रॅक्टर मोर्चादरम्यान उफाळलेला हिंसाचार, यात सार्वजनिक मालमत्तेचं झालेलं नुकसान, जखमी झालेले पोलीस, लाल किल्ल्यावर चढलेले आंदोलक आणि त्यानंतर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीस शेतकरी आंदोलनाबाबत सरकारच्या भूमिकेवर टीका करत विरोधकांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर टाकलेला बहिष्कार, इत्यादी सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोणत्या विषयावर बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button