breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

धक्कादायक! पतंजलीच्या टूथपेस्टमध्ये मांसाहारी पदार्थ मिसळल्याचा आरोप

Patanjali : रामदेव बाबा यांच्या पतंजली या कंपनीविरोधात गंभीर आरोप करण्यात आला आहे. कंपनीची टूथपेस्ट दिव्या दंत मंजनमध्ये मांसाहारी पदार्थाचा वापर करण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. कंपनी त्यावर हिरवे लेबल लावते, म्हणजे हे उत्पादन पूर्णपणे शाकाहरी असल्याचं सांगत ग्राहकांची दिशाभूल केली जात असल्याचंही तक्रारदारांचं म्हणणं आहे.

वकील शासा जैन यांनी पतंजलीला आपल्या शाकाहारी उत्पादनात मांसाहाराचा वापर केल्याचा आरोप करत कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ट्वीटरवर चिंता व्यक्त करत शाशा यांनी म्हटलं आहे की, परंतु त्यांच्या दिव्या दंत मंजन टूथपेस्टमध्ये सी फेन (कटलफिश) वापरण्यात आले आहे. त्यामुळे मी कायदेशीर नोटिशीद्वारे कंपनीकडून स्पष्टीकरणही मागितले आहे.

हेही वाचा – हिंडेनबर्गचे आरोप चुकीचे, अदानी समूहाला सर्वोच्च न्यायालयाच्या क्लीन चिट

मी स्वत: पतंजलीची अनेक उत्पादने वापरते. परंतु आता तुमच्या बाजूने स्पष्टीकरण येईपर्यंत, मला या उत्पादनांबद्दल संशय आहे. ११ मे रोजी राठवलेल्या या नोटिशीमध्ये कंपनीला १५ दिवसांत उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे. याबाबत कंपनीने स्पष्टीकरण न दिल्यास त्याच्याविरूद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाईल. वकिलाने ट्वीटरवर अपलोड केलेल्या कंपनीच्या उत्पादनात सी फेन (कटलफिश) वापरण्यात आल्याचे स्पष्टपणे लिहिलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button