breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

शेअर बाजारात पडझड सुरुच

मुंबई | कोरोना विषाणूचा कहर जगभरातील शेअर मार्केटमध्ये सुरुच आहे. भारतीय शेअर बाजारात त्याचा मोठा परिणाम दिसत आहे. सकाळी 11 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल 2500 अंकांनी कोसळला. बाजाराची सुरुवातच पडझडीने झाली. त्यामुळे निर्देशांक 33 हजार 200 अंकांपर्यंत कोसळला.

बाजारात आज दिवसाची सुरुवात 1700 अंक कोसळून झाली. तर निफ्टीतही 500 अंकांची घसरण पाहायला मिळाली. पुढे यामध्ये आणखी वाढ होत गेली आणि एकावेळी निर्देशांक 2500 अंकांपेक्षा जास्त अंकांनी कोसळल्याचं पाहायला मिळालं. त्याआधी बुधवारी सेन्सेक्स 35,697 आणि निफ्टी 10,458 अंकांवर बंद झाली होती. त्यानंतर आज बाजाराला सुरुवात होताच, गडगडाट पाहायला मिळाला. मोठमोठे शेअर्स धाडकन आपटल्याने बाजार कोसळला.

भारतीय शेअर मार्केटप्रमाणे अमेरिका मार्केटही 1400 अंकांनी घसरला. यादरम्यान रुपयाही 68 पैशांनी घसरुन त्याचं मूल्य 74.32 रुपये प्रति डॉलर इतकं झालं. 11 ऑक्टोबर 2018 नंतर पहिल्यांदाच रुपया इतका घसरल्याचं पाहायला मिळालं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button