breaking-newsTOP NewsUncategorizedआंतरराष्टीयआरोग्यताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशराष्ट्रिय

छातीत दुखू लागल्यानं रिकी पाँटिंग रुग्णालयात दाखल

मेलबर्न । महाईन्यूज । वृत्तसंस्था।

ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडिज संघात सामने सुरु आहेत. या सामन्यांची काॅमेंटरी पाँटिंग करत होता. पहिल्या पाच दिवसीय सामन्यात पाँटिंग काॅमेंटरी करत होता. तिसऱ्या दिवशी काॅमेंटरी सुरु असताना अचानक पाँटिंगला त्रास सुरु झाला. त्याच्या धातीत दुखू लागले. पाँटिंगने दुर्लक्ष न करता याबाबत सहकाऱ्याला सांगितले. ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या छातीत दुखु लागल्याने त्याला शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडिज संघात सामने सुरु आहेत. या सामन्यांची काॅमेंटरी पाँटिंग करत होता. पहिल्या पाच दिवसीय सामन्यात पाँटिंग काॅमेंटरी करत होता. तिसऱ्या दिवशी काॅमेंटरी सुरु असताना अचानक पाँटिंगला त्रास सुरु झाला. त्याच्या धातीत दुखू लागले. पाँटिंगने दुर्लक्ष न करता याबाबत सहकाऱ्याला सांगितले. त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे पाँटिंगवर तातडीने उपचार करण्यात आले. रिकी पाँटिंग रुग्णालयात दाखल झाल्याने चिंता व्यक्त होत होती. मात्र त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे रुग्णालयाने सांगितले. पाँटिंग पुढील काॅमेंटरी करणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र चॅनेलने याबाबत अधिकृतरित्या कोणतीही घोषणा केलेली नाही.

पाँटिंगने १६८ पाच दिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. पाच दिवसीय सामन्यात ४१ शतक व ६२ अर्धशतक करुन त्याने एकूण १३३७८ धावा केल्या आहेत. तसेच ३७५ एक दिवसीय सामन्यात ३० शतक व ८२ अर्धशतक केले आहेत. एक दिवसीय सामन्यात पाँटिंगने एकूण १३७०४ धावा केल्या आहेत. टी- २० सामन्यात त्याने ४०१ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया संघ पाँटिंगच्या नेतृत्त्वात २००३ व २००७ साली एकदिवसीय क्रिकेटमध्ये विश्वविजेता बनला आहे. पाँटिंग हा आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षकही आहे.

गेल्यावर्षी भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनाही छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची अँजोग्राफी करण्यात आली व त्यानंतर अंजोप्लास्टी करण्यात आली. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डीन जोन्सचे सप्टेंबर २०२० मध्ये अचानक निधन झाले. ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक व नेदरलँडचे कोच रेयान कैंपबेल याचेही हद्रयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या प्रकरणांमुळे आता खेळाडूंना आरोग्याविषयक मार्गदर्शनाची आवश्यकता असल्याचे समोर आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button