breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

संत तुकाराम महाराज संस्थानवर प्रशासक नेमणूक करा, विभागीय आयुक्तांना पत्र

  • सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांची मागणी
  • पारदर्शक कारभारासाठी जिल्हाधिका-यांकडे तक्रार

पिंपरी ( महा ई न्यूज ) – देहुगांव येथील जगद्गगुरु संत तुकाराम महाराज मंदिर संस्थानचा कारभार पारदर्शक व गतीमान व्हावा, आणि महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्तांना चांगल्या सोयी-सुविधा मिळाव्यात, याकरिता त्या संस्थानवर शासकीय प्रशासक नेमणूक करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली. यासंर्दभात विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

काळभोर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, देहू येथील संत तुकाराम महाराज मंदिर संस्थानचा कारभार शेकडो वर्षापासून मोरे कुटूंबिय पाहात आहे. या संस्थानकडे राज्यासह परराज्यातील लाखो भाविक हे देणगी स्वरुपात सोने, चांदी, हिरे, माणिक, मोती इत्यादी वस्तू व रोख स्वरुपात लाखो रुपये दान म्हणून दिले जाते. परंतू, संत तुकाराम महाराज मंदिर संस्थान हे खासगी मालमत्ता असल्यासारखे सर्व निधी व रोख रक्कम इतर दान स्वरुपातील वस्तू हे स्वताःकडे ठेवून घेतल्या जात आहेत.

तसेच राज्य शासन लाखो रुपये निधी मंदिर प्रशासनाला दिला जातो. त्या निधीचा गैरवापर होत आहे. संस्थानची जमिन देखील परस्पर विकून विल्हेवाट लावली जात आहे. याविषयी त्या संस्थानचा एका सदस्याने यापुर्वी तक्रार केली होती. मात्र, राजकीय दबावापोटी हे प्रकरण दडवण्यात आले. त्यामुळे संस्थानच्या जमिन मालकी हक्क रेकाॅर्ड तपासण्यात यावे. विक्री झालेल्या जमिनीची चाैकशी करुन ती जमिन परत देहू संस्थानला द्यावी. अशी मागणी केली.

याशिवाय संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 24 जूनपासून सुरु होणार आहे. पालखी रथावर अनेक भक्तगण देणगी दान करीत असतात. त्या सर्व पैशाचा हिशोब ठेवला जात नाही. अनेकजण ती देणगी स्वताःच्या खिशात घालतात. त्यामुळे लाखो भाविक भक्ताची फसवणूक होत आहे.

सध्या पिंपरी ते पुणे मेट्रोचे काम संथगतीने सुरु आहे. पालखी सोहळ्यात सहभागी वारकरी, भाविक यांना रहदारी व मार्गक्रमण करण्यास कसोटीने करावी लागणार आहे. त्यामुळे यंदाचा पालखी मार्ग देहूरोड ते कात्रज हायवे या मार्गाने काढण्यासाठी उच्चस्तरीय आढावा बैठक घेवून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून निर्णय घ्यावा. या सर्व प्रकरणाची आपण योग्य ती दखल घेवून चाैकशी करुन कार्यवाही करावी, संत तुकाराम महाराज मंदिर देहू येथील कारभार पारदर्शक करण्यासाठी शासकीय प्रशासक अधिकारी नेमणूक करावी, अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.

याबाबत देहू संस्थानचे अध्यक्ष मधुकर मोरे यांना दुरध्वनीवरुन संर्पक साधला. त्यांना याविषयी प्रतिक्रिया विचारली. मात्र, या प्रकरणावर बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे.

 

 

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button