breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मुलीला मॅगी तयार करायला सांगितलं, नराधमाने आतून दरवाजा बंद करुन तिच्यावर केला अत्याचार

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

मुलीला मॅगी तयार करून देण्यास सांगून त्याने आतून दरवाजा बंद करीत नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये आरोपी राजेश्वर उर्फ राजा नरहरी भुसावर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्याचाराची ही घटना मार्च 2018 मध्ये हिंजवडी येथे घडली होती. आता या प्रकरणी 15 वर्षीय पीडित मुलीने हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी घरी एकटीच असल्याचे पाहून नराधम तिच्या घरात घुसला होता. तिच्या एकटेपणाचा फायदा घेत त्याने पीडितेला मॅगी तयार करून देण्यास सांगितले.

पीडिता किचनमध्ये जाताच त्याचे दरवाजा बंद करून तिच्यावर अत्याचार केला. पीडिता अल्पवयीन असल्याचे माहिती नराधमाला माहीत होते, तरी देखील नराधमाने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एवढेच नाही तर त्याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यास तिला व तिच्या आईला त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पीडित तरुणीने मोशी येथील चैतन्य महिला मंडळाच्या संस्थापिका ज्योती पठाणीया यांना माहिती दिली. त्यांनी पोलिसांकडे पत्रव्यवहार करून या प्रकरणाला वाचा फोडली. हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button