breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू

मुंबई : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केला होता. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक अशीच घटना घडली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे दहीसरमधील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार  झाल्याची घटना समोर आली आहे.  या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झालाय.

शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्या आरोपीचं नाव मोरीस नरोना म्हणून आहे आणि सूत्रांच्या माहितीनुसार मिळालेली माहिती मोरिस नरोना यांनी स्वतःला गोळी मारून घेतली.

माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. पैशाच्या वादातून मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. मुरीस भाई नावाने प्रसिद्ध असलेला हा व्यक्ती स्वतःला समाजसेवक म्हणतो. एक वर्षांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांनी त्याच्या विरोधात दहिसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला होता. मॉरिस भाई हा आमदार सुनील राणे यांच्या जवळचा असल्याचं बोललं जातंय.

हेही वाचा – लोकसभा निवडणुकांसाठी ठाकरे गटाचे उमेदवार ठरले! जवळपास ११ उमेदवारांवर शिक्कामोर्तब

अभिषेक घोसाळकर हे कायम चर्चेत राहिले  होते. विनोद घोसाळकर यांची सून आणि त्यांचा मुलगा हे नगरसेवक राहिले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते रिक्युअर बोर्डाचे ते सदस्य होते. राजकीय वाद आणि आर्थिक वादातून ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button