breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिल्ली महापालिका निवडणूक 5 पैकी 4 ‘आप’ने जिंकल्या

नवी दिल्ली- दिल्ली महापालिकेच्या 5 प्रभागांमधील पोटनिवडणुकीत आम आदमी पार्टीने जबरदस्त यश मिळवले आहे. या निवडणुकीत 5 पैकी तब्बल 4 जागा आपने जिंकल्या आहेत. एक जागा काँग्रेसने जिंकली आहे. विशेष म्हणजे या पोटनिवडणुकीत भाजपच्या हाती भोपळा आला आहे.

वाचा :-देशातील तरुणांना प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत भारतीय भाषांमध्ये सर्वोत्कृष्ट सामग्री मिळेल- पंतप्रधान

दिल्ली महापालिकेच्या 5 प्रभागांमधील पोटनिवडणुकीसाठी 28 फेब्रुवारीला मतदान घेण्यात आले होते. आज सकाळी त्याची मतमोजणी सुरू झाली. त्यात सुरुवातीपासूनच आपचे उमेदवार आघाडीवर होते. शेवटी आम आदमीच्या उमेदवारांनी शालीमार बाग नॉर्थ, कल्याणपुरी, त्रिलोकपुरी आणि रोहिणी सी-वॉर्ड येथे विजय मिळवला. तर चौहान बांगर प्रभागात काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. यापूर्वी शालिमार बागमध्ये भाजपचा नगरसेवक होता. त्रिलोकपुरीत आपच्या विजय कुमार यांनी भाजपचे ओमप्रकाश यांचा 4 हजार 986 मतांनी पराभव केला. रोहिणीत आपच्या राम चन्दर यांनी भाजपचे राकेश यांचा 2,985 मतांनी पराभव केला. शालिमार बाग येथे आपच्या सुनीता मिश्राने भाजपच्या सुरभी राजूचा 2,705 मतांनी पराभव केला. कल्याणपुरीत आम आदमीचे धीरेन्द्र कुमार 7,043 मतांनी विजयी झाले. तेथे भाजपचे सियाराम पराभूत झाले. पोटनिवडणुकीतील या घवघवीत यशामुळे आपमध्ये आनंदाचे वातावरण आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आम आदमी पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांना मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button