breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

जत भरचौकात गोळ्या झाडून गुंडाचा खून, अनैतिक संबंधातून घटना

गावठी कट्टा जप्त; संशयित चौघे ताब्यात

जत | प्रतिनिधी

जत तालुक्यातील कंठीमध्ये भर चौकात रेकॉर्ड वरील गुन्हेगार धनाजी नामदेव मोठे (वय ४२ ) याचा निर्घृणपणे गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे. ही खळबळजनक घटना गुरुवारी रात्री १०:४५ वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे जत तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
जत पोलिसांनी या प्रकरणी संशयित चौघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अनैतिक संबंधाच्या कारणास्तव हा खून झाल्याचे प्राथमिक पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
अधिक माहिती अशी की, धनाजी मोठे याचं गावातील एका अविवाहित मुलींशी अनैतिक सबंध होते. या कारणातून मुलीच्या घरच्या लोकांमध्ये व धनाजी मोठे यांच्यात सारखा वाद होत. याप्रकरणी आगोदर मुलीच्या घरच्यांनी जत पोलीस ठाण्यात धनाजी मोठे याच्यावर गुन्हा दाखल केले होते. सतत मुलीशी छळ काढत असल्याने घरच्यांनी त्याचा राग मनात धरून गुरुवारी रात्री १०:४५ वाजण्याच्या सुमारास गावातील आंबेडकर समाज मंदिरासमोर भर चौकात गुन्हेगार धनाजी मोठे याला अडवून गोळ्या झाडून व डोक्यावर दगडाने ठेचून त्याचा निर्घृणपणे खून केला आहे. घटनास्थळी एक गावठी पिस्तुल चार,बंदुकीच्या गोळ्या मिळून आले आहेत.हे पिस्तुल नेमकं आरोपीची का मयताच हे पोलिसांच्या तपासात स्पष्ट होणार आहे.
घटनेची माहिती मिळताच जतचे डिवायएसपी रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, सांगली जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी घटना स्थळाची पाहणी केली. या प्रकरणी प्रकरणी मयतचा भाऊ संदीप नामदेव मोठे यांनी नामदेव भीमा लांडगे, गोविंद नागेश लांडगे, मुरलीधर मधुकर वाघमारे, श्रीधर मधुकर वाघमारे, सर्व राहणार कंठी ता.जत यांच्या विरोधात जत पोलिसात फिर्याद दिली आहे.


रेकॉर्ड वरील गुन्हेगार धनाजी मोठे याच्यावर जत ,सांगली येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.गावठी पिस्तुल तस्करी,अनेक गुन्हेगारी टोळीशी संबंध, विनापरवाना शस्त्र बाळगणे असे गुन्हे गुंड धनाजी मोठे याच्यावरती दाखल आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button