breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीपुणे

‘काश्मीरकन्येला पुण्यातून ‘आधार’; पुनीत बालन ग्रुप व आफरीन हैदर यांच्यात करार

पुणे : ३७ व्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेवर आपली मोहोर उमटविणाऱ्या आफरीन हैदरला पुण्यातील पुनीत बालन ग्रुपच्या वतीने करारबद्ध करण्यात आले आहे. २१ वर्षीय आफरीनने आतापर्यंत विविध राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्पर्धेत दमदार आणि लक्ष्यवेधी कामगिरी करताना आपला तायक्वांदोमध्ये आपला दबदबा निर्माण केला.

श्रीनगर येथील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये सातव्या इयत्तेमध्ये असताना आफरीनने तायक्वांदो खेळायला सुरुवात केली. चित्रपटातील मारधाड पाहून ती या क्रीडा प्रकाराकडे आकर्षित झाली. सुरुवातीच्या काळात ती मुलासोबत सराव करत असे. त्यामुळे तिच्या खेळात एका नैसर्गिक आक्रमकपणा आला. अनेकदा तिने तिच्या शाळेतील मुलांना  मारलेल्या किक्समुळे देखील तिला शिक्षा भोगावी लागली. हाच आक्रमकपणा तिच्या खेळामध्ये देखील उतरला आणि ती पहाता पहाता जिल्हास्तरीय स्पर्धेत विजेती ठरली.

तिचा प्रवास सुसाट सुरूच होता. तिने अनेक जिल्हा, विभाग स्पर्धा जिंकताना आपने नाणे खणखणीत असल्याचे दाखवून दिले. त्यानंतर १९ वर्षी झालेल्या नेपाळ येथे झालेल्या जी१ या अंतरराष्ट्रीय स्पर्धेत ती सहभागी झाली होती तिने कांस्य पदकाची कमाई केली. दिल्ली विद्यापीठाच्या जीजस अँड मेरी महाविद्यालयात सध्या ती शिक्षण क्षेत असून विविध स्पर्धा परीक्षांची देखिल ती तयारी करत आहे.

‘‘कोणत्याही वैयक्तिक खेळ खेळणाऱ्या खेळाडूला अनेकदा आर्थिक बाबींसाठी खूप झगडावे लागते. हा अनुभव  माझ्या देखील पाठीशी आहे. मात्र, आता पुनीत बालन ग्रुप सोबत जोडल्या गेल्याने माझी महत्वाची समस्या दूर झाली असून आगामी स्पर्धामध्ये माझ्या पूर्ण क्षमतेने खेळताना भारताचे नाव अंतरराष्ट्रीय स्तरावर चमकविण्याचा प्रयत्न करणार आहे.

‘‘वैयक्तिक खेळांमध्ये आफरीनने आजवर चमकदार कामगिरी बजावली आहे.  काश्मीर खोऱ्यातील ही गुणवत्ता नक्कीच अंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविण्यासाठी सक्षम आहे, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.

  • पुनीत बालन, संचालक, पुनीत बालन ग्रुप, पुणे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button