breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

धक्कादायक! एअर इंडियाच्या विमानात एका महिलेला विंचवाचा दंश

मुंबई : नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेला विंचवाने दंश केला आहे. २३ एप्रिल रोजी नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या विमानात ही घटना घडली आहे. दरम्यान, या महिलेला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २३ एप्रिल रोजी एअर इंडियाच्या एआय ६३० विमानाने नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या विमनात एका महिलेला विंचवान दंश केला. यानंतर मुबंई विमानतळावर वैद्यकीय पथक तैनात करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर विमान मुंबई विमानतळावर उतरताच महिलेला रूग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेची प्रकृती आता स्थिर असून तिला रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

२३ एप्रिल रोजी एअर इंडियाच्या एआय ६३० विमानाने नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या विमनात एका महिलेला विंचवान दंश केला. विमान मुंबई विमानतळावर उतरताच महिलेला वैद्यकीय मदत देण्यात आली. तसेच आमच्या कर्मचाऱ्यांनी विमानाची तपासणी केली असता एक विंचूही आठळून आला. योग्य प्रक्रियेनंतर त्याला बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, असं एअर इंडियने आपल्या निवेदनत म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button