breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

WTC Final Day 2 : अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबला

साऊथम्प्टन – भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणार्‍या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा पहिला दिवस पावसामुळे पूर्णपणे धुऊन गेला. परंतु त्यानंतर दुसर्‍या दिवशीही खराब वातावरणामुळे चाहत्यांना निराशा व्हावे लागले. साऊथम्प्टनमधील या ऐतिहासिक सामन्याच्या दुसर्‍या दिवशी केवळ ६४.४ षटके खेळली गेली आणि अंधूक प्रकाशामुळे सामना अधिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्याचे जाहीर केले.

सामन्याच्या सुरुवातीला न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. यानंतर खराब प्रकाशामुळे खेळ तीन वेळा थांबवावा लागला. इतकेच नव्हे, तर टी-ब्रेकही लवकर घेण्यात आला. अखेर खेळ थांबला तेव्हा भारताचा कर्णधार विराट कोहली (४४) आणि अजिंक्य रहाणे (२९) नाबाद होते. या दोघांमध्ये ५८ धावांची भागीदारी झाली आहे.

भारताकडून सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी डावाची आश्वासक सुरुवात केली. मात्र ६१ धावांवर भारताने आपला पहिला गडी रोहितच्या रुपात गमावला. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने रोहितला बाद केले. स्लीपमध्ये उभ्या असलेल्या साऊदीने रोहितचा झेल टिपला. रोहितने ६ चौकारांसह ३४ धावा केल्या. रोहित बाद झाल्यानंतर एका धावेच्या फरकाने शुबमनही माघारी परतला. नील वॅग्नरने शुबमनला वॉटलिंगकरवी झेलबाद केले. शुबमनने २८ धावा केल्या. या दोघांनंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी डाव सांभाळायचा प्रयत्न केला, परंतु उपाहारानंतर भारताने अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजाराला गमावले. ट्रेंट बोल्टने पुजाराला वैयक्तिक ८ धावांवर पायचित पकडले. पुजारानंतर मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणे मैदानात आला. विराट आणि अजिंक्यने भारताला शंभरीपार नेले. मग तिसऱ्या सत्रात काही वेळ अंधूक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. काही वेळानंतर खेळ पुन्हा सुरू झाला. दरम्यान, विराट आणि अजिंक्यने भारतासाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. परंतु काही षटके खेळल्यानंतर अंधूक प्रकाशामुळे खेळ पुन्हा थांबवण्यात आला. यानंतर खेळ होणार नसल्याचे पंचांनी जाहीर केले. विराट कोहली एका चौकारासह ४४, तर अजिंक्य ४ चौकारांसह २९ धावांवर नाबाद राहिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button