breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत 35 दिवसांत उभारलं 2170 बेड्सचं अत्याधुनिक रुग्णालय

मुंबई – राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप कायम आहे. येत्या काही दिवसांत कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिकेकडून सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईत केवळ 35 दिवसांत 2170 बेडच्या कोव्हिड रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेने मालाड भागात केवळ 35 दिवसांत कोरोना रुग्णालयाची निर्मिती केली आहे. हे कोव्हिड रुग्णालय जर्मन तंत्रज्ञानाच्या आधारे बनवण्यात आले आहे. हे रुग्णालय अग्निरोधक आणि पर्यावरण अनुकूल आहे. या रुग्णालयात 70 टक्के बेड हे ऑक्सिजनयुक्त आहेत. तसेच 384 बेड हे आयसोलेशनसाठी ठेवण्यात आले आहेत. या रुग्णालयात मुलांसाठी 42 आयसीयू बेड बसविण्यात आले आहेत. तर यासह 20 बेड डायलिसीससाठी आहेत. तसेच या रुग्णालयावर नजर ठेवण्यासाठी 240 सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई विकास प्राधिकरणाकडून हे रुग्णालय बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button