breaking-newsराष्ट्रिय

एसबीआय ग्राहकांसाठी नियम बदलला, एका दिवसात ‘एवढे’ पैसे काढता येणार

स्टेट बँक ऑफ इंडियाने ऐन दिवाळीच्या काळात नवीन नियम लागू केले आहेत. देशातली सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे. या नियमांनुसार आता एसबीआय एटीएम धारकांना एका दिवसात फक्त २० हजार रुपये काढता येणार आहेत. आधी ही मर्यादा ४० हजार रुपये एवढी होती. एसबीआयच्या क्लासिक आणि मॅस्ट्रो डेबिट कार्डधारकांसाठी हा नियम असणार आहे. बँकेकडून सर्व शाखांना याबाबत निर्देश जारी करण्यात आले आहेत.

एसबीआयने जवळपास एक महिन्यापूर्वी क्लासिक आणि मॅस्ट्रो डेबिट कार्डधारकांसाठी 31 ऑक्टोबरपासून एका दिवसात फक्त २० हजार रुपये काढता येणार असल्याची माहिती दिली होती. जर तुम्हाला एका दिवसात २० हजाराहून जास्त पैसे काढायचे असतील तर उच्च श्रेणीतील कार्डसाठी अर्ज करावा, असे बँकेने स्पष्ट केले आहे. ‘ग्लोबल इंटरनॅशनल कार्ड’ आणि ‘प्लॅटिनम कार्ड’च्या मर्यादेत बदल करण्यात आलेला नाही. ग्लोबल इंटरनॅशनल कार्ड धारकांना दिवसाला ५० हजार आणि प्लॅटिनम कार्ड धारकांना १ लाखापर्यंतची रक्कम काढण्याची मुभा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button