पिंपरी / चिंचवड

पूर्ववैमनस्यातून एकावर कु-हाडीने वार

पिंपरी l प्रतिनिधी

शेजा-यासोबत बोलत थांबलेल्या व्यक्तीवर पूर्ववैमनस्यातून कु-हाडीने वार केले. ही घटना रविवारी (दि. 20) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास ओटास्किम निगडी येथे घडली.

राहुल मगर सरवदे (वय 34, रा. संजय नगर समाज मंदिराच्या मागे, ओटास्किम, निगडी, पुणे. मुळ गाव मु. पो. उत्क दावतपूर, ता. औसा, जि.लातूर) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाबासाहेब शाहू कांबळे (वय 38, रा. संजय नगर, ओटास्किम, निगडी पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सरवदे हे मिळेल त्या ठिकाणी बिगारी काम करतात. रविवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास सरवदे आणि त्यांचे शेजारी सुरज यादव असे दोघेजण त्यांच्या घरासमोर बोलत थांबले होते. त्यावेळी सरवदे यांच्या ओळखीचा आरोपी बाबासाहबे कांबळे त्यांच्याकडे पाहत होता. सरवदे आणि आरोपी बाबासाहेब यांचे मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून बाबासाहेब याने घरातून कु-हाड आणली आणि सरवदे यांच्या खांद्यावर कु-हाडीने वार केले. यामध्ये सरवदे गंभीर जखमी झाले. त्यांच्या खांद्याला सहा टाके पडले आहेत. बाबासाहेब याने सरवदे यांच्या पत्नीला देखील शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक विकास ताकतोंडे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button