breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

साकीनाका परिसरातील नीलकंठ भवनाला भीषण आग

मुंबई – मुंबईच्या साकीनाका परिसरातील नीलकंठ भवन इमारतीत भीषण आग लागली आहे. याठिकाणी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, आगीमुळे परिसरात धुराचे मोठ-मोठे लोण पसरले असून नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.

साकीनाका जंक्शन परिसरात असलेल्या नीलकंठ भवन याठिकाणी ही आग लागली आहे. नीळकंठ भवनच्या इमारतीत अनेक हॉटेल्स, बँक आणि इतर अस्थापनांची कार्यालये असून ही भीषण आग नीळकंठ भवनाच्या दुसऱ्या मजल्यावर लागल्याचे समजते आहे. सध्या ही आग विझवण्याचे काम सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button