breaking-newsराजकारणराष्ट्रिय

धक्कादायक! नर्सिंग विद्यार्थ्यांची ‘संयम’ चाचणी घेण्याच्या नावाखाली स्वयंसेवी संस्थेचा संचालक करत होता लैंगिक शोषण

झारखंड |

झारखंड राज्यात अतिशय गंभीर आणि धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका गैर-सरकारी संस्थेच्या (एनजीओ) संचालकला लैंगिक शोषणाच्या ( Sexual Abuse) आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. नर्सिंग विद्यार्थ्यांची संयम बाळगण्याची क्षमता जाणून घेण्यासाठी संबंधित संचालक विद्यार्थ्यांच्या कपड्यांमध्ये हात घालत असे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संचालकाला लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

झारखंड राज्यातील खूंटी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था संचालकावर नर्सिंग संस्थेच्या अनेक विद्यार्थ्यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. पीडित मुलींनी सांगितले की, संस्थेचे संचालक बबलू उर्फ ​​परवेझ आलम विद्यार्थ्यांना संयम चाचणीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना पकडून त्यांच्या कपड्यात हात घालत असे. इंडिया टुडेने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, आरोपी परवेझ आलम बर्‍याच दिवसांपासून नर्सिंग मुलींसोबत हे लाजिरवाणे कृत्य करत होता.

काही विद्यार्थ्यांनी परवेझच्या निर्लज्जपणाची कहाणी एका सामाजिक कार्यकर्त्याला सांगितली होती. त्यानंतर ही बाब उघडकीस आली. विद्यार्थ्यांच्या तक्रारीच्या आधारे सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी बखला यांनी राज्यपालांना यासंदर्भात पत्र लिहिले. यानंतर ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर (बीडीओ) अन्वये तपास सुरू करण्यात आला आणि स्थानिक महिला पोलिस ठाण्याचे पथकही संस्थेत पाठविण्यात आले. तपास पथकाने आपला अहवाल खूंटी एसपी आशुतोष शेखर यांना पाठवला असून स्वयंसेवी संस्थेच्या संचालकांना अटक करण्यात आली आहे.

वाचा- वनमंत्री पदासाठी शिवसेना नगरसेवकाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button