breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

WI vs IND : भारतीय संघाचा ऐतिहासिक विजय! वन डे सीरीज २-१ ने जिंकली!

WI vs IND : भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये काल (१ ऑगस्ट) ला तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय मालिकेतील सामना पार पडला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा २०० धावांनी पराभव केला. या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला ३५२ धावांचे आव्हाहन दिले होते. मात्र वेस्ट इंडिजला हे आव्हाहन पूर्ण करता आले नाही. या सामन्यात वेस्ट इंडिजने केवळ १५१ धावा केल्या, आणि पराभव पत्कारावा लागला.

या ऐतिहासिक सामन्यात भारताच्या शार्दूल ठाकूर याने धडाकेबाज कामगिरी केली. शार्दुलने या सामन्यात चार विकेट घेतल्या तर मुकेश कुमार या खेळाडूने तीन फलंदाजांना मैदानातून बाहेर पाठवले. तसेच कुलदीप यादवने दोन विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे या तुफान खेळाडूंच्या कामगिरीने भारतीय संघ तिसरा सामना जिंकून भारतीय संघाने मालिका २-१ च्या फरकाने खिशात घातली.

हेही वाचा – संभाजी भिडे यांना तात्काळअटक करा: अजित गव्हाणे

या सामन्यात सलामीवीर शुबमन गिल ८५ धावा, ईशान किशान ७७ धावा आणि कर्णधार हार्दिक पांड्या नाबाद ७० धावा या तिघांनी दमदार अर्धशतके केली आहे. या मालिकेतील टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयामुळे भारतीय संघाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button