breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

सगळ्यात मोठा पनवती कोण? भाजपा नेत्यानं राहुल गांधींना डिवचलं

Assembly Election Results 2023 : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येत आहे. तेलंगणा वगळता इतर तीन राज्यात भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. यावरून भाजपा नेते सीटी रवी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना डिवचलं आहे.

विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला होता. त्यानतंर राजस्थानमधील बायतू येथील प्रचारसभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘पनवती’ असे संबोधून टीका केली होती. हाच संदर्भ घेऊन सीटी रवी यांनी राहुल गांधींना लक्ष्य केलं आहे.

हेही वाचा  –  आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त २५०० गाईंना चारा वाटप

सीटी रवी यांनी एक ट्वीट केलं आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसला मेन्शन करत, आता सगळ्या मोठा पनवती कोण? असा सवाल सीटी रवी यांनी उपस्थित केला आहे.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?

आमचे खेळाडू तिथे चांगले जिंकणार होते, पण पनवतीमुळे त्यांचा पराभव झाला. टीव्हीवाले हे सांगणार नाहीत, पण जनतेला सर्व माहीत आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button