breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पीएमपीएमएलच्या संचालक मंडळावर होणार सत्तारुढ पक्षनेत्याची नियुक्ती

पिंपरी- पुणे महानगर परिवहन महामंडळ च्या संचालक मंडळावर  पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांची संचालक  म्हणून नियुक्ती होणार आहे. दरम्यान, संचालक पद निर्मितीस राज्य सरकारची मान्यता घेतली जाणार आहे.सन 2007 मध्ये पीएमटी आणि पीसीएमटी  या दोन्ही परिवहन संस्थेचे एकत्रीकरण होऊन पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. हि संस्था स्थापन करण्यात आली. संस्था स्थापन झाल्यानंतर सरकारच्या निर्णयाद्वारे संचालक मंडळाची रचना अंतिम करण्यात आली.

यामध्ये पुणे महापालिकेचे  तीन संचालक घेतले. त्यात महापौर, स्थायी समिती सभापती आणि महासभेतून निवडून आलेलय एका नगरसेवकाचा समावेश होता.तर, पिंपरी-चिंचवड पालिकेचे  महापौर, स्थायी समिती अध्यक्ष असे दोन संचालक नियुक्तीस मान्यता देण्यात आलेली आहे. पिंपरी-चिंचवड पालिकेचे भौगोलिक क्षेत्र व लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे पुणे पालिकेप्रमाणे पिंपरी पालिकेचाही एक जादा संचालक असणे आवश्यक वाटते. जेणेकरुन पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सोईसाठी परिवहनचा पाठपुरावा करणे सोईचे होईल.या संचालक पदावर सत्तारुढ पक्षनेत्याची संचालक म्हणून नियुक्ती करण्यास महासभेत उपसूचनेद्वारे मान्यता देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button