breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

BCCI ने केली वार्षिक कराराची घोषणा; ‘या’ खेळाडूला मिळाली मोठी संधी

चार कॅटेगरीमध्ये २६ खेळाडूंचा समावेश

BCCI : बीसीसीआयने २०२२-२३ साठी वार्षिक कराराची यादी जाहीर केली आहे. बीसीसीआयने चार कॅटेगरीमध्ये एकुण २६ खेळाडूंचा समावेश केला आहे. ए प्लस, ए, बी आणि सी अशा चार कॅटेगरीमध्ये खेळाडू निवडले आहेत. करारानुसार प्रत्येक खेळाडूला वार्षिक किती पैसे दिले जाणार हे यामध्ये जाहीर केलं आहे.

ए प्लस मध्ये भारतीय संघाताली ४ खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जाडेजा यांचा समावेश आहे.

ए कॅटेगरीमध्ये ५ खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये हार्दिक पांड्या, आर. आश्विन, मोहम्मद शमी, ऋषभ पंत आणि अक्षर पटेल या खेळाडूंचा समावेश आहे.

तर बी कॅटेगरीत ६ खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल या खेळाडूंचा समावेश आहे.

तर सी कॅटेगरीत ११ खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये उमेश यादव, शिखर धवन, शार्दुल ठाकूर, इशान किशन, दीपक हुड्डा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह आणि केएस भारत या खेळाडूंचा समावेश आहे.

कोणत्या खेळाडूला किती पैसे दिले जातात?

ए प्लस ग्रेडमधील खेळाडूंना वार्षिक ७ कोटी रूपये दिले जातात. तर ए ग्रेडमधील खेळाडूंना वार्षिक ५ कोटी रूपये दिले जातात. तर बी ग्रेडमधील खेळाडूंना वार्षिक ३ कोटी रूपये दिले जातात. तर सी ग्रेडमधील खेळाडूंना वार्षिक १ कोटी रूपये दिले जातात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button