TOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुस्तकात प्रत्येक पानाबरोबर सरावासाठी एक कोरे पान; दीपक केसरकर यांची माहिती 

पुणे : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पुढील वर्षांपासून पुस्तकांबरोबर वह्यादेखील शासनामार्फत मोफत देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. पुस्तकातील प्रत्येक पानाबरोबर विद्यार्थ्यांना सरावासाठी एक कोरे पान दिले जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना सरावासाठी अतिरिक्त वही नेण्याची गरज भासणार नाही, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी दिली.

श्री भैरवनाथ शिक्षण संस्था संचालित आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलचा २२ वा वर्धापनदिन आणि ‘नवरस २०२२’ या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात दीपक केसरकर बोलत होते.  केसरकर म्हणाले,की इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे पालकांना आकर्षण असले, तरी आपला पाल्य चांगला शिकला पाहिजे, ही त्यामागची भूमिका महत्त्वाची आहे. रोबोटिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा नव्या तंत्रज्ञानाशी आपण मैत्री केली पाहिजे. भारतीय मुलांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. खेडय़ापाडय़ात, वाडी वस्तीवरील मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी राज्याचा शिक्षण विभाग, अधिकारी-कर्मचारी आणि शिक्षक मेहनत घेत आहेत. भारत हा सर्वाधिक तरुणांचा देश असल्याने येत्या १० वर्षांत कौशल्ययुक्त मनुष्यबळ निर्मिण्याचा प्रयत्न सुरू आहेत असेही केसरकर यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button