breaking-newsपुणे

पाच कार्यकर्ते मागे नसलेल्या प्रकाश जावडेकरांना मोदींच्या कृपेने बंपर लॉटरी – संजय काकडे

पुणे –  पाच कार्यकर्ते आणि एकही नगरसेवक निवडून आणण्यासाठी पक्षाला उपयोग नसलेल्या केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर यांना पंतप्रधान  मोदीच्या कृपेमुळे कॅबिनेट मंत्रिपदाची  बंपर लॉटरी लागली आहे, असा टोला  भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी लगावला आहे. 

शिवसेना भाजपची युती झाली नाहीतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे दीड लाखांच्या मतांनी पराभूत होतील, असे भाकीत काकडे यांनी केले होते. यावर जावडेकरांना पुण्यात विचारले असता काकडे यांचा निवडणूक अंदाज म्हणजे मटका, अशी  उपाहासात्मक टीका  जावडेकर यांनी केली होती. या टीकेवर काकडे यांनी  जोरदार पलटवार केला आहे.

काकडे म्हणाले की, जावडेकर यांच्यामागे ५ कार्यकर्ते नाहीत. त्यांना पुण्यात एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही. त्यांचा पक्षाला काहीही उपयोग नाही. बिनकामाचे असताना पद मिळणे यालाच बंपर लॉटरी लागणे असे म्हणतात, असे प्रत्युत्तर काकडे यांनी दिले.  माझा अंदाज, हा सर्व्हे आहे की मटका, हे २०१९ च्या निवडणुकीत जावडेकर साहेबांना कळेल, असाही टोला  काकडे यांनी लगावला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button