breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

भारतीय संघाला मोठा धक्का! जसप्रीत बुमराह आशिया कप सोडून मायदेशी परतला

Jasprit Bumrah : आशिया कप २०२३ च्या मध्यावर भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मायदेशी परतला आहे. भारतीय संघ आज नेपाळविरूद्ध आशिया चषकातील आपला दुसरा सामना खेळणार आहे. परंतु, जसप्रीत बुमराह हा सामना खेळणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वैयक्तिक कारणांमुळे भारतात परतला आहे. मात्र, चाहत्यांना काळजी करण्याची गरज नाही. जसप्रीत बुमराह कदाचित आशिया कप सुपर-४ टप्प्यासाठी संघात सामील होऊ शकतो. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमी संघात सामील होणार आहे. उद्या भारत आणि नेपाळ यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे या सामन्यात शमी मैदानात उतरलेला दिसू शकतो.

हेही वाचा – राज्यात पाऊस परतणार! हवामान खात्याने ‘या’ जिल्ह्यांना दिला ‘यलो अलर्ट’

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळं रद्द झाला. तर आजच्या नेपाळविरूद्धच्या सामन्यावरही पावसाचं संकट आहे. पाकिस्तानचा संघ सुपर- ४ मध्ये पोहोचला आहे. त्यामुळे भारत आणि नेपाळ यांच्यातील लढत महत्वाची आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button