breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाढत्या गुन्हेगारीची नैतिक जबाबदारी म्हणून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; राष्ट्रवादीची मागणी

पिंपरी, (महा ई न्यूज) – मागील पंधरा दिवसात शहरात अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्याच्या चार घटना घडल्या व एका पिडीत मुलीचा खून करण्यात आला. पिंपरी चिंचवडचे स्वतंत्र पोलिस आयुक्तालय सुरु करण्यात आले. तरीदेखील शहरातील गुन्हेगारांवर पोलिसांना अद्यापही नियंत्रण मिळविता आले नाही. शहरातील युवती, महिला मानसिक दडपणाखाली राहत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा पालकमंत्री गिरीष बापट यांनी यावर साधी प्रतिक्रियादेखील दिलेली नाही. गुन्हेगारांना कडक शासन करण्याची मागणी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शहर राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची भेट घेऊन चर्चा केली.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर आणि युवती अध्यक्षा वर्षा जगताप यांच्या वतीने पद्मनाभन यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, पोलिस, राजकारणी आणि गुंडांचे हितसंबंध असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. त्यामुळे सराईत गुन्हेगारांवर पोलिसांचे नियंत्रण राहिलेले नाही. तडीपार गुंडदेखील दिवसाढवळया शहरात वावरून अल्पवयीन मुलींवर अत्याचार करीत आहेत. यामुळे शहराच्या सुरक्षेला बाधा पोहचत आहे. कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून कासारसाई (हिंजवडी), पिंपरी आणि चिंचवड येथील पीडित कुटूंबियांना भेटण्यास मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना वेळ नाही, ही लाजिरवाणी बाब असल्याची टिका विशाल वाकडकर यांनी केली आहे.

शहरातील गुन्हेगारी, बेकायदेशीर धंदे, दुचाकी वाहने तोडफोड व जाळण्याच्या घटना, महाविद्यालय व सार्वजनिक ठिकाणी महिला व मुलींची छेडछाड, सोनसाखळी चोरीच्या घटना वाढतच आहेत. शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे पोलिसांची जबाबदारी आहे. त्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला व अमिषाला बळी पडू नये, तसेच कायद्याची कडक अंमलबजावणी करून गुन्हेगारांवर जरब बसवावी, अशीही मागणी वाकडकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदन देताना खासदार वंदना चव्हाण, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, युवती शहराध्यक्षा वर्षा गायकवाड, शहर पार्टी प्रवक्ते फजल शेख आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button