ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

​ न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या सृष्टी खंडागळेची विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

​जिल्हास्तरीय स्पर्धेत १५ खेळाडूंचा सहभाग; स्वयंम माने आणि उत्तम भाटींचे चमकदार प्रदर्शन

पिंपरी चिंचवड:  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, थेरगावच्या खेळाडूंनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. शाळेतील १४ वर्षे वयोगटाखालील व २४ किलो वजन गटात इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी सृष्टी खंडागळे हिने प्रथम क्रमांक पटकावून अहिल्यानगर येथे होणाऱ्या विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी आपली जागा निश्चित केली आहे.

​या स्पर्धेत न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या तब्बल १५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. प्रचंड स्पर्धा आणि खेळाडूंची मोठी संख्या असतानाही शाळेतील स्वंयम् माने आणि उत्तम भाटी या दोघांनी आपापल्या वजन गटात अत्यंत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

​या स्पर्धेत शाळेचे खेळाडू स्वयंम माने, उत्तम भाटी, संजीव भाटी, श्याम माळी, कार्तिक तांबे, कार्तिक गावडे, मानव काळे, युवराज पाटुकळे, प्रतीक प्रजापती, रेहान नदाफ, रिजवान सय्यद, रईस सय्यद, सृष्टी खंडागळे, मदस्वी कांबळे, भाग्यश्री गायकवाड आणि पृथ्वी रोडे यांनी सहभाग नोंदवून उत्स्फूर्त कामगिरी केली. हे सर्व खेळाडू शाळेचे क्रीडा शिक्षक श्री. यशवंत माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत आहेत.

हेही वाचा –  ‘कडक कपडे घालून इम्प्रेशन मारतात, पण ओनरशिप नसते’; नितीन गडकरींचा राजकीय नेत्यांना टोला

​ मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव

​सृष्टी खंडागळे हिच्या या घवघवीत यशाबद्दल आणि सर्व सहभागी खेळाडूंच्या कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. विजय पवार, सचिव अशोक मोरे सर, खजिनदार सुरेखा पवार मॅडम आणि उपाध्यक्ष निलेश पलघोमल सर यांच्यासह संस्थेच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

​तसेच, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी श्री. दीपक कान्हेरे सर, क्रीडा पर्यवेक्षक अशोक शिंदे सर, प्रकाश गोवीनवाड सर, शुभम कानडे सर, शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या नाईक मॅडम व नायगम ॲग्नीस मॅडम, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंना पुढील विभागीय स्पर्धेसाठी व भविष्यातील क्रीडा वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button