रश्मिका-विजयच्या नात्यात दुरावा? इन्स्टाग्रामवरील एका गोष्टीमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Rashmika and Vijay Devarakonda | दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह बॉलिवूडमध्येही लोकप्रिय असलेली जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या नात्याबाबत सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगल्या आहेत. विजय देवरकोंडाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सध्या कोणालाही फॉलो केलेले दिसत नसल्याने, यावरून नेटकऱ्यांनी दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचे अंदाज बांधण्यास सुरुवात केली. काहींनी थेट दोघांचे नाते संपल्याच्या अफवाही पसरवल्या. मात्र, या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसून त्या केवळ सोशल मीडियावरील तर्कवितर्कांवर आधारित आहेत.
काही सोशल मीडिया युजर्सनी असा दावा केला की, विजयने रश्मिकाला अनफॉलो केले आहे. मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की विजय देवरकोंडाच्या इन्स्टाग्राम खात्यावर फॉलोइंग काउंट ‘शून्य’ आहे, म्हणजेच तो कोणालाही फॉलो करत नाही. दुसरीकडे, रश्मिका मंदाना अजूनही विजयला इन्स्टाग्रामवर फॉलो करत आहे. याव्यतिरिक्त, विजय आणि रश्मिका यांनी सुरुवातीपासूनच सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो केलेले नव्हते, असेही काही चाहत्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे केवळ सोशल मीडियावरील ॲक्टिव्हिटीवरून नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे असल्याचे स्पष्ट होते.
हेही वाचा
आयपीएल २०२७ मध्ये खेळणार की नाही? एमएस धोनीचे मोठे विधान; म्हणाला,..
दरम्यान, हे दोघे नुकतेच ‘कॉफी विथ करण ९’ या चॅट शोमधील वक्तव्यांमुळे चर्चेत आले होते. या कार्यक्रमात विजयने सांगितले होते की, रश्मिकाने त्याला लग्नासाठी सुमारे १०० वेळा विचारणा केली होती. रश्मिकानेही एका वर्षात अनेकदा विजयला लग्नाबाबत विचारल्याचे मान्य केले होते. या खुलाशांनंतर चाहत्यांमध्ये त्यांच्या लग्नाची मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.




