ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

SPPU आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेत आकुर्डीच्या डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचा ‘ऐतिहासिक चौकार’; सलग चौथ्यांदा विजेतेपद

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेत आकुर्डी येथील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संघाने पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट कामगिरीची छाप पाडत सलग चौथ्यांदा विजेतेपद पटकावून ऐतिहासिक ‘चौकार’ लगावला.

पीसीसीओईआर, रावेत येथे पार पडलेल्या या स्पर्धेत डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कौशल्य, सांघिक समन्वय, आत्मविश्वास आणि जिद्दीचे दर्शन घडवत विजेतेपदावर आपले नाव कोरले. सलग चार वर्षे विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत अव्वल स्थान मिळवणे ही महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय आणि अभिमानास्पद कामगिरी ठरली आहे.

विजेता संघ

  • शंतनू निर्फळे – ENTC
  • राज कोठारी – IT
  • प्रतीक वाघमारे – IT
  • प्रथमेश काकडे – AIDS
  • शिवांश शर्मा – AIDS

‘Inter-Zonal’ साठी दोन खेळाडूंची निवड

या ऐतिहासिक विजेतेपदासोबतच महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. संघातील राज कोठारी आणि प्रथमेश काकडे या दोन खेळाडूंची Inter-Zonal Camp साठी निवड झाली असून, ते आगामी Inter-Zonal Tournament मध्ये सहभागी होणार आहेत.

हेही वाचा

बाबुरावजी घोलप साहेबांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण; पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वर्धापन दिनी वाघोलीत भव्य पूजन सोहळा!

क्रीडा विभागाच्या नियोजनबद्ध प्रयत्नांना यश

महाविद्यालयाच्या या यशामध्ये खेळाडूंच्या सातत्यपूर्ण सरावासोबतच क्रीडा विभागाचे नियोजन, मार्गदर्शन आणि प्रभावी व्यवस्थापन यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.

शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ. आबाजी एस. माने यांनी महाविद्यालयातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने नियोजनबद्ध पद्धतीने काम करत खेळाडूंना आवश्यक सुविधा, योग्य मार्गदर्शन, स्पर्धात्मक वातावरण आणि प्रोत्साहन देण्यावर भर दिला. खेळाडूंच्या क्षमतेची योग्य निवड करून त्यांना विद्यापीठस्तरीय स्पर्धांसाठी तयार करणे, नियमित सराव व स्पर्धांचे नियोजन करणे तसेच खेळाडूंच्या कामगिरीचा सातत्याने आढावा घेणे, या माध्यमातून त्यांनी क्रीडा विभागाला अधिक प्रभावी बनविण्यासाठी प्रयत्न केले.

टेबल टेनिस संघाच्या सलग चौथ्या विजेतेपदामध्ये डॉ. आबाजी एस. माने यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाला आणि सातत्यपूर्ण प्रोत्साहनाला विशेष महत्त्व असल्याचे महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाकडून सांगण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या खेळाडूंना विद्यापीठ तसेच पुढील स्तरावरील स्पर्धांसाठी आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळत आहे.

मान्यवरांकडून अभिनंदन

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल D Y Patil Education Complex चे ट्रस्टी श्री. तेजस पाटील, कॅम्पस डायरेक्टर ॲडमिरल (रिटायर्ड) अमित विक्रम, प्राचार्य डॉ. सौ. पी. मालती, डीन अॅडमिनिस्ट्रेशन डॉ. एस. एस. सरनोबत, डीन अफेयर्स डॉ. स्मिता पाटसकर, रजिस्ट्रार श्री. भालेराव, शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ. आबाजी एस. माने आणि असिस्टंट प्रोफेसर (स्पोर्ट्स) वैभव घोरपडे यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून आगामी Inter-Zonal स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयाच्या टेबल टेनिस संघाच्या या सलग चौथ्या विजेतेपदामुळे डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आकुर्डीच्या क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण यशाची परंपरा अधिक भक्कम झाली आहे.

सलग चार वर्षे, चार विजेतेपदे आणि विजयाची अजिंक्य परंपरा!

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group