Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

पाकिस्तान संघात मॅच फिक्सिंग? ७ खेळाडूंसह प्रशिक्षकांची हकालपट्टी; खेळाडूंचे फोन जप्त

Pakistan Cricket Match Fixing Allegations | इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दारुण पराभव झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघ आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डात (PCB) प्रचंड मोठा भूकंप झाला आहे. लॉर्ड्स कसोटीत १९४ धावांनी पराभूत झाल्यानंतर बोर्डाने मोहम्मद रिझवान, सलमान अली आघा, इमाम-उल-हक यांच्यासह तब्बल सात प्रमुख खेळाडूंना थेट संघातून बाहेरचा रस्ता दाखवला. एवढेच नव्हे, तर मुख्य प्रशिक्षक सरफराज अहमद आणि गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुल यांचीही तातडीने पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. या धक्कादायक कारवाईमागे केवळ खराब कामगिरी नसून ‘मॅच फिक्सिंग’चे गंभीर संशय असल्याच्या चर्चेने क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

वगळण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये रिझवान, सलमान, इमाम यांच्याव्यतिरिक्त अली उस्मान, खुर्रम शहजाद, आमिर जमाल आणि मोहम्मद अवैस झफर यांचा समावेश आहे. त्यांच्या जागी पाच अनकॅप्ड खेळाडूंसह सात नव्या चेहऱ्यांना संघात स्थान देण्यात आले. मात्र, ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, हा बदल केवळ खेळातील अपयश नसून यामागे संशयास्पद कारणांची किनार आहे. पाकिस्तानमधील ‘365 News’नुसार, संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या काही खेळाडूंचे मोबाईल फोन बोर्डाने जप्त केले असून, तिसरी कसोटी संपेपर्यंत ते पीसीबीच्याच ताब्यात राहणार आहेत.

हेही वाचा

राज्यातील बंदरे विकासाला गती देण्यावर भर

पीसीबीकडून अंतर्गत चौकशी सुरू

या गंभीर प्रकरणावर इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ECB) आणि पीसीबीने अधिकृत वक्तव्य टाळले असले, तरी पीसीबीचे मीडिया संचालक आमिर मीर यांनी अंतर्गत चौकशी सुरू असल्याचे मान्य केले. “शिस्त आणि संशयास्पद वर्तनाच्या वृत्तांची दखल घेत बोर्डाने अंतर्गत शिस्तभंगाची चौकशी सुरू केली आहे. नियमांनुसार सर्व प्रक्रिया पूर्ण केली जात आहे,” असे मीर म्हणाले. दुसरीकडे, पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी मात्र सावध भूमिका घेत, “सामने जिंकण्यासाठी खराब कामगिरी करणाऱ्यांना बदलणे भाग होते, हा केवळ संघातील अंतर्गत बदल आहे,” असा दावा करत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button