Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

भारत-अफगाणिस्तान कसोटी सामन्यानंतर आता वनडे सीरिजचा थरार, पहिली मॅच केव्हा?

IND vs AFG : भारतीय क्रिकेट संघाने 2018 नंतर भारत दौऱ्यावर आलेल्या अफगाणिस्तानवर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठा विजय मिळवला. भारताने 8 जून रोजी शुबमन गिल याच्या नेतृत्वात न्यू चंडीगडमध्ये झालेल्या एकमेव कसोटी सामन्यातील अडीच दिवसात अफगाणिस्तानवर विजय मिळवला. भारताने अफगाणिस्तानवर डाव आणि 300 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर आता टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. उभयसंघात एकूण 3 एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहे. तसेच भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. त्यामुळे चाहत्यांना या मालिकेची प्रतिक्षा लागून आहे. या निमित्ताने या मालिकेचं वेळापत्रक जाणून घेऊयात.

शुबमन गिल टीम इंडियाचं या मालिकेत नेतृत्व करणार आहे. तर हशमतुल्लाह शाहीदी याच्याकडे अफगाणिस्तानच्या कर्णधारपदाची जबाबदारी पार पार पाडणार आहे. या मालिकेत सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि ऑलराउंडर हार्दिक पंड्या खेळणार असल्याचं निश्चित झालं आहे. दोघांनी फिटनेस सिद्ध केल्यानंतर त्यांना बीसीसीआयकडून हिरवा कंदील देण्यात आला आहे. एकदिवसीय मालिकेसाठी निवड झाली तेव्हा रोहित आणि हार्दिक हे दोघेही बीसीसीआयनुसार फिट नव्हते. मात्र त्यानंतर दोघांनी आपला फिटनेस सिद्ध केला. त्यामुळे हे दोघे खेळताना दिसणार आहेत.

हेही वाचा –  असा नाश्ता ज्यामुळे तुम्हाला कधीच भासणार नाही, डॉक्टरांची गरज, जाणून घ्या कोणते आहे ‘ते’ पदार्थ

भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याला दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. विराटच्या जागी भारतीय संघात यशस्वी जैस्वाल याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता विराटच्या कमबॅकसाठी चाहत्यांना काही महिने प्रतिक्षा करावी लागणार आहे.

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

भारत विरुद्ध अफगाणिस्तान, पहिला सामना, 13 जून, धर्मशाला

भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दुसरा सामना, 17 जून, लखनौ

भारत विरुद्ध अफगाणिस्तान, तिसरा सामना, 20 जून, चेन्नई

दरम्यान भारत विरुद्ध अफगाणिस्तान दोन्ही संघात एकदिवसीय मालिका खेळवण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. मालिकेला 13 जूनपासून सुरुवात होणार आहे. दुसरा सामना हा 17 जून रोजी होणार आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना 20 जून रोजी पार पडणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button