Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

उष्णतेच्या लाटेत वाढतोय गॅस-अॅसिडिटीचा त्रास! ‘सुपरफूड’ आहाराने मिळू शकतो दिलासा…

Health  : देशभरात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव वाढत असताना आरोग्याशी संबंधित तक्रारींमध्येही वाढ होताना दिसत आहे. विशेषतः गॅस, अॅसिडिटी, पोट फुगणे आणि अपचन यांसारख्या समस्यांनी अनेकांना त्रस्त केले आहे. तज्ज्ञांच्या मते, वाढते तापमान, शरीरातील पाण्याची कमतरता आणि बदललेली जीवनशैली यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. मात्र दिवसाची सुरुवात ते रात्रीपर्यंत योग्य ‘सुपरफूड’ आहार घेतल्यास या समस्यांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकते.

उन्हाळ्यात शरीराची पचनक्रिया मंदावते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर हलका आणि पचायला सोपा आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. ओट्स, केळी, पपई यांसारखी फायबरयुक्त फळे आणि पदार्थ पोटाला आराम देतात. यासोबतच कोमट पाणी किंवा लिंबूपाणी घेतल्यास शरीर हायड्रेट राहते आणि अॅसिडिटीचा त्रास कमी होतो.दिवस पुढे सरकत असताना मधल्या वेळेत योग्य खाण्याची सवय ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

दीर्घ काळ उपाशी राहिल्यास अॅसिडिटी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे ताक, काकडी, टरबूज यांसारखे पाण्याने समृद्ध आणि थंडावा देणारे पदार्थ खाण्याचा तसेच ताक हे विशेषतः पचन सुधारण्यासाठी आणि शरीर थंड ठेवण्यासाठी उपयुक्त असल्याचे ठाण्यातील डॉ पराग देशपांडे यांनी सांगितले. मानले जाते.

हेही वाचा –  रिलीजच्या दुसऱ्याच दिवशी नेटफ्लिक्सवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंडिंग आहे ‘हा’ चित्रपट, तुम्ही पाहिलात का?

दुपारच्या जेवणाबाबत तज्ज्ञांचा भर साध्या आणि संतुलित आहारावर आहे. कमी मसाले, कमी तेल आणि हलके पदार्थ यांचा समावेश असावा. पोळी-भाजी, भात-डाळ किंवा मूगडाळ यांसारखे पदार्थ पचायला सोपे असल्याने ते योग्य ठरतात. फायबरयुक्त आहारामुळे पचन सुधारते आणि पोट हलके राहते.संध्याकाळच्या वेळेस भूक लागल्यावर तळलेले किंवा जड पदार्थ खाण्याची सवय अनेकांमध्ये दिसते. नेमके हेच पदार्थ गॅस आणि अॅसिडिटी वाढवण्यास कारणीभूत ठरतात. त्याऐवजी दही, फळे किंवा हलके स्नॅक्स निवडल्यास पोटाला आराम मिळतो. दही आणि ताक यांसारख्या प्रोबायोटिक पदार्थांमुळे आतड्यांतील चांगल्या जिवाणूंची वाढ होते आणि पचनसंस्था अधिक सक्षम बनते असेही डॉ देशपांडे म्हणाले.

रात्रीचे जेवण शक्यतो हलके आणि वेळेवर करणे अत्यावश्यक आहे. झोपण्याच्या किमान दोन ते तीन तास आधी जेवण केल्यास अॅसिडिटीचा त्रास टाळता येतो. पपई, केळी किंवा उकडलेल्या भाज्या यांसारखे पदार्थ रात्रीसाठी योग्य मानले जातात.याशिवाय, बडीशेप, आलं आणि पुदिना यांसारखे नैसर्गिक घटकही पचन सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतात. हे पदार्थ गॅस कमी करण्यास आणि पोट शांत ठेवण्यास मदत करतात.

एकूणच उष्णतेच्या लाटेत गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास टाळण्यासाठी औषधांवर अवलंबून राहण्यापेक्षा योग्य आहारशैली अवलंबणे अधिक प्रभावी ठरते. दिवसाभरात पाण्याचे पुरेसे सेवन, हलका आणि संतुलित आहार, तसेच ‘सुपरफूड्स’चा योग्य समावेश केल्यास पचनसंस्था निरोगी ठेवणे शक्य असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button