Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

गुंतवणूकदारांसाठी इन्व्हेस्ट महाराष्ट्रची स्थापना; उद्योग विभागावर थेट मुख्यमंत्र्यांचा कब्जा! ३ हजार कोटींचा निधी…

मुंबई : येत्या चार वर्षात म्हणजेच सन २०३० पर्यंत एक लाख कोटी डाॅलर अर्थव्यवस्थेचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी राज्यात अधिकाधिक गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र गुंतवणूक प्रोत्साहन संस्था-इन्व्हेस्ट महाराष्ट्र ची स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या संस्थेला तब्ब्ल ३ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था असून, विश्वासार्ह जागतिक भागीदार म्हणून उदयास आला आहे. तसेच, नवोन्मेष, उत्पादन क्षेत्र आणि शाश्वत विकासाला चालना देणारा देश म्हणूनही भारताची ओळख निर्माण झाली आहे. देशाच्या या वाटचालीची आर्थिक शक्ती म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जात आहे.

राज्याचा राष्ट्रीय सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) सुमारे ५१ लाख कोटी रुपयांचा वाटा आहे, तसेच देशाच्या औद्योगिक उत्पादनात १५.४टक्के पेक्षा अधिक योगदान आहे. राज्याने परकीय थेट गुंतवणूक ((FDI)) आकर्षित करण्यात सातत्याने देशात आघाडी राखली असून, गेल्या दशकात देशातील एकूण एफडीआय पैकी ३१टक्के पेक्षा अधिक वाटा महाराष्ट्राचा राहिला आहे.

हेही वाचा –  आकुर्डी येथील प्रा. अवधुत कुलकर्णी यांना स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पीएच.डी. पदवी

विशाल आर्थिक क्षमता, प्रगत धोरणात्मक चौकट, सक्षम गुंतवणूकदार वर्ग, धोरणात्मक भौगोलिक स्थान आणि जागतिक दर्जाची औद्योगिक पायाभूत सुविधा यांच्या बळावर महाराष्ट्र देशातील सर्वात सक्षम आणि स्पर्धात्मक औद्योगिक परिसंस्थांपैकी एक म्हणून उदयास आला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगर आणि नाशिक ही प्रमुख शहरे वित्तीय सेवा, आयटी/आयटीईएस, लॉजिस्टिक्स, विद्युत वाहने , स्वच्छ ऊर्जा आणि प्रगत उत्पादन क्षेत्रांची प्रमुख केंद्रे म्हणून सातत्याने विकसित होत असून, अनेक उदयोन्मुख क्षेत्रे व प्रदेश पुढील काळात विकासाच्या नव्या संधी निर्माण करीत आहेत.

तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि राजस्थान यांसारख्या राज्यांनी त्यांच्या औद्योगिक क्षमतेच्या पलीकडे जाऊन गुंतवणूक प्रोत्साहन संस्था, तसेच जागतिक गुंतवणूकदार सुविधा केंद्रे स्थापन केली आहेत, यातून गुंतवणूक आकर्षित करणे आणि जागतिक स्तरावर संपर्क वाढविणे त्यांना शक्य होत आहे. याच धर्तीवर थेट परदेशी गुंतवणुकीतील आपले अव्वल स्थान टिकवून ठेवण्यासाठी आणि सन २०३० पर्यंत लाख कोटी अमेरिकन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्र गुंतवणूक प्रोत्साहन संस्था -इन्व्हेस्ट महाराष्ट्र (Maharashtra Investment Promotion Agency Invest Maharashtra)ची स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

इन्व्हेस्ट महाराष्ट्र संस्था गुंतवणूक आकर्षण व सुलभीकरणासाठी तसेच गुंतवणूक प्रोत्साहन व आकर्षणावर लक्ष केंद्रित करणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ((MIDC)), राज्य गुंतवणूक, व्यापार व गुंतवणूक सुलभीकरण कक्ष (MAITRI), उद्योग संचालनालय (Directorate of Industries), महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड( MITL) तसेच राज्यातील इतर संबंधित संस्थांबरोबर समन्वय साधून जागतिक व देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या सर्वांगीण गरजा पूर्ण करण्यासाठी कार्य करेल. ही सेवा अर्थव्यवस्थेतील प्राथमिक, दुय्यम आणि तृतीयक अशा सर्व क्षेत्रांतील गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. या संस्थेसाठी ३ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

या संस्थेच्या प्रशासकीय परिषदेच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री, सह अध्यक्षपदी दोन्ही उपमुख्यमंत्री तर उपाध्यक्षपदी उद्योगमंत्री आणि सदस्य सचिवदी उद्योग विभागाचे प्रधान सचिव असतील.तर संचालक मंडळातही मुख्यमंत्री अध्यक्ष तर उद्योगमंत्री उपाध्यक्ष असतील.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button