Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

महायुतीत भाजप ११ तर मित्र पक्षांना सहा जागा; विधान परिषदेसाठी तोडगा

मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या १७ जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला. भाजप दोन पाऊले मागे येण्यास तयार आहे. मित्र पक्षांना म्हणजे शिवसेना शिंदे पक्षाला चार जागा आणि दुसरा मित्र पक्ष अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दोन जागा देण्यास तयार आहे त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत विधानपरिषद निवडणुकीच्या जागा वाटपाचा पेपर सुटलेला आहे असे म्हटले होते.

पुढील महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ निवडणुकीसाठी महायुतीचा जागा वाटपाचे सूत्र ठरले असल्याचे समजते. १७ जागांपैकी ११ जागांवर भाजप, ४ जागा शिवसेना शिंदे पक्षाला तर दोन जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सोडण्यात येणार आहेत. शिवसेना शिंदे पक्षाने कोकण मतदार संघावर केलेला दावा सोडला आहे.

हेही वाचा –  चिंता वाढवणारी बातमी! मान्सूनचे आगमन लांबणार? महत्वाची अपडेट समोर

विधान परिषदेच्या १७ जागांच्या निवडणुकीपूर्वी महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. भाजपकडून अपेक्षित जागा मिळत नसल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागील दोन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून होते. भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी जास्त जागा मिळाव्यात याकरिता मनधरणी केली आहे. भाजप मित्रपक्षांना जास्त जागा देण्यास तयार नाही. त्यामुळे अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत, असे सांगत सर्व १७ जागा आम्ही जिंकणार, असा दावा शिंदे यांनी केला आहे. विधान परिषदेत शिवसेना दुसरा क्रमांकाचा प्रश्न व्हावा यासाठी शिंदे प्रयत्नशील आहेत.या पार्श्वभूमीवर राजकीय डावपेच आखत असून विधान परिषदेच्या १७ जागांच्या निवडणुकीत किमान सात जागांवर निवडणूक लढवता यावी, असा आग्रह अगोदर धरला होता. पालघर, ठाणे आणि छ६पती संभाजीनगर शिवसेनेला सोडण्यास भाजपची तयारी आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button