Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चिंता वाढवणारी बातमी! मान्सूनचे आगमन लांबणार? महत्वाची अपडेट समोर

Weather update : मे महिना संपत आला असून आता महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची वाट पाहिली जात आहे. अशातच मान्सूनबाबत एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्यामुळे यंदा मान्सूनच्या प्रवासात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, २६ मे रोजी केरळ किनारपट्टीवर दाखल होणारा मान्सून वाटेतच अकडून पडला आहे.

हवामान विभागाने केरळमधील मान्सूनच्या आगमनाची कोणतीही नवीन तारीख अद्याप जाहीर केली नसल्याने शेतकरी आणि सर्वसामान्यांची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे मान्सूनची आगमन लांबणार तर नाही ना अशी भीती व्यक्त केली जात आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात ३ जूनपासून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा –  राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना स्वत:चे गाव बदलण्याची संधी; स्वग्राम रजा सवलतीच्या लाभासाठी तरतूद

मात्र, 26 मे रोजी केरळला येणारा मान्सून वाटेतच अडकल्याने तो केरळपर्यंत पोहोचलाच नाही. 11 जूनपर्यंत किनारपट्टी भागात आणि राज्याच्या अंतर्गत होणाऱ्या पावसाबाबत अजूनही हवामान विभागाकडून नवी अपडेट समोर आलेली नाही.

जूनच्या दोन आठवड्यात पाऊस अगदी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा राहील. 4 ते 11 जून किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस आणि ऊन असा खेळ पाहायला मिळू शकतो. ११ जूननंतर संपूर्ण महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात मान्सूनचा पाऊस येण्याची शक्यता आहे.

मात्र, दुसरीकडे विदर्भाला पुढील ४८ तास उष्णतेच्या लाटेचा तीव्र इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे. असे चित्र असले तरी राज्यातील काही ठिकाणी मान्सून पूर्व पावसाने धूमाकुळ घातला आहे. अनेक ठिकाणी गारपिटीसदृष्य पाऊस झाला आहे. यामुळे बळीराज्याचे मोठे नुकसान झाले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button