हवामानात मोठा बदल! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा

Weather alert : गेल्या काही दिवसांपासून विविध राज्यांत अधूनमधून पाऊस, मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यामुळे वातावरण बदलताना दिसत आहे. तीव्र उन्हात आता आकाशात ढगाळ वातावरण तयार होत आहे.
अशातच हवामान विभागाने पुढील ३ दिवस राज्यातील विविध भागांत वादळी पावसाचा इशारा दिला आहे.
वादळी पावसाचा इशारा विदर्भातील काही जिल्ह्यांना देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या हवामान बदल्यामुळे शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे.
या जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता
यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीधाराशिव, लातूर आणि नांदेड
हेही वाचा – सूर्यकुमार यादवला डच्चू मिळणार! ‘हा’ खेळाडू होणार टीम इंडियाचा पुढील कर्णधार
राज्यातील इतर भागांत अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून तापमानात चढ-उतार कायम राहू शकतात. हवामानातील या बदलामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सावध राहून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंब ईआणि पालघर जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागू शकतो.
गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास रायगड जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले. महाड आणि पोलादपूर या तालुक्यांना अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. महाडमधील खरवली, ढालकाठी, सोलमकोंड भागात वादळामुळे घरांची छपरे उडून नुकसान झाले. या भागातील अनेक ठिकाणी झाडे, विजेचे खांब उन्मळून पडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.
भारतीय हवामान विभागाने (IMD) ८ मे रोजी उत्तर प्रदेश, बिहारसह अनेक राज्यांसाठी वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा दिला आहे. काही भागांत ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.





