Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोशीतील साईनाथ हॉस्पिटलला डॉ. भीमराव आंबेडकर यांची सदिच्छा भेट;

परवडणाऱ्या रोबोटिक जॉईन्ट रिप्लेसमेंट सुविधेचे कौतुक

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांच्या मोशी प्राधिकरणातील साईनाथ हॉस्पिटल येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तसेच भारतीय बौद्ध महासभाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी डॉ. सुहास कांबळे व त्यांच्या परिवाराकडून डॉ. आंबेडकर यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.

या भेटीदरम्यान हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या रोबोटिक जॉईन्ट रिप्लेसमेंट सेंटरची सविस्तर माहिती देण्यात आली. अत्याधुनिक तंत्रज्ञान, रुग्णकेंद्री सेवा आणि किफायतशीर उपचारपद्धती यांचा आढावा घेताना डॉ. भीमराव आंबेडकर यांनी हॉस्पिटलमधील सुविधा व एकूणच आरोग्यसेवेचे विशेष कौतुक केले.

यानिमित्ताने आयोजित सत्कार समारंभात बोलताना डॉ. भीमराव आंबेडकर म्हणाले, “डॉ. सुहास कांबळे हे खऱ्या अर्थाने समाजाचे डॉक्टर आहेत. समाजासाठी काम करणाऱ्या चांगल्या लोकांना भेटण्याची माझी इच्छा असते. त्यामुळे डॉ. कांबळे यांना भेटून मला विशेष आनंद झाला. त्यांनी आजवर उत्कृष्ट रुग्णसेवा केली आहे. आता नगरसेवक म्हणून त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील तसेच आपल्या प्रभागातील नागरिकांची सेवा अधिक प्रभावीपणे करावी.”

हेही वाचा : मस्साजोगात अश्विनी देशमुख यांचा पराभव, कारण काय?

ते पुढे म्हणाले, “राजकारणात सुशिक्षित आणि प्रामाणिक लोक येणे अत्यंत गरजेचे आहे. नव्या दमाची, शिकलेली माणसे राजकारणात येऊन त्याचे स्वरूप बदलले पाहिजे. त्या बदलाची सुरुवात नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांच्यापासून झाली आहे.”

यावेळी डॉ. सुहास कांबळे, डॉ. राज कांबळे, डॉ. समृद्धी कांबळे, संतोष जोगदंड, बापूसाहेब गायकवाड, बाळासाहेब रोकडे, भाऊसाहेब डोळस, प्रा. बी. बी. शिंदे, विशाल कदम तसेच हॉस्पिटलमधील डॉक्टर, व्यवस्थापन अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश वाघमारे यांनी केले.

सामाजिक बांधिलकी, परवडणारी आरोग्यसेवा आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा यांचा संगम असलेले साईनाथ हॉस्पिटल पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठी विश्वासाचे केंद्र ठरत असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button