Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्यावर बागेश्वर बाबाचा माफीनामा

Dhirendra Shastri | छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून सर्वत्र टीका झाल्यानंतर बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. हिंदू राष्ट्राच्या उभारणीची संकल्पना आम्हाला त्यांच्याकडूनच मिळाली आहे. ते आपल्या गुरूप्रती किती समर्पित होते, हे सांगण्याचा प्रयत्न मी केला होता. मात्र, काही हिंदू विरोधी शक्तींकडून माझ्या वक्तव्याला चुकीचे दाखवण्यात आले. तरीही, माझ्या वक्तव्यामुळे कुणी दुखावले असेल तर मी माफी मागतो, असे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी प्रत्येक सनातनी हा छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो. जगातही त्यांच्याविषयी वाईट बोलणारा कुणी नाही. मी स्वत: स्वप्नातही त्यांच्याविषयी चुकीचे बोलण्याचा विचार करू शकत नाही. हिंदू राष्ट्राची उभारणी ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊनच आम्ही करत आहोत. त्यांनी या देशासाठी केलेले कार्य महान आहे. परंतु, आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढून दुसऱ्यांना त्याचा राजकीय फायदा पोहचवून देण्यासाठी कायम माझे वक्तव्य चुकीचे दाखवले जाते, असेही धीरेंद्र शास्त्री म्हणाले.

हेही वाचा 

मरीन ड्राइव्हवर पहाटे भीषण अपघात; दुचाकीच्या धडकेत तिघांचा मृत्यू 

मी कुणाचाही अपमान केला नसून धर्मांतरणाचा रथ रोखण्याचा प्रयत्न काही शक्ती करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मी कधीही अंधश्रद्ध पसरवत नाही. माझी पूजा करा असेही कुणाला सांगत नाही. श्रद्धेने लोक आमच्या दरबारात येतात. त्यांना हनुमान भक्त करण्याचा केवळ माझा प्रयत्न असतो, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातही लव जिहादची अनेक प्रकरणे वाढत असून त्यावर कठोर कायदा यायला हवे असेही धीरेंद्र शास्त्री म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button