ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील सोसायटीधारकांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी फेडरेशन ‘कटिबद्ध’!

पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघाची निवडणूक शांततेत

बिनविरोध निवडणूक करण्यासाठी दत्तात्रय देशमुख यांच्या मनाचा मोठेपणा

पिंपरी- चिंचवड । प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्थांचा महासंघाच्या व्यवस्थापन समितीची निवडणूक शांततेत व उत्साहात पार पडली. या निवडणुकीचा अधिकृत निकाल प्राधिकृत अधिकारी विलास लिंबळे यांनी जाहीर केला. विशेष म्हणजे, महासंघाचे मावळते अध्यक्ष दत्तात्रय देशमुख यांनी निवडणूक बिनविरोध करावी, असा संदेश अर्ज माघारी घेतला. मात्र, ११ जागासांठी १४ अर्ज असल्यामुळे मतदान घ्यावे लागले.

सोसायटी फेडरेशनच्या कमिटीसाठी निवडणूक सन 2026 ते 2031 या कालावधीसाठी घेण्यात आली. एकूण ११ सदस्यांची ही निवडणूक सर्वसाधारण मतदार संघातून घेण्यात आली असून, एकूण अधिकृत 27 मते पडली. यापैकी सर्व 27 मते वैध ठरली असून, एकही मत अवैध झाले नाही. रविवार, दि. 26 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता विशेष अधिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतच मतदान प्रक्रिया पूर्ण करून निकाल जाहीर करण्यात आला. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार पूर्ण करण्यात आली.

 

या निवडणुकीत विविध सोसायटींच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. प्राधिकृत अधिकारी विलास लिंबळे यांनी निवडणुकीचा सविस्तर अहवाल व बैठकीचे इतिवृत्त संबंधित प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी तथा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (3) यांच्याकडे सादर केले आहे.या निवडणुकीमुळे संस्थेच्या पुढील पाच वर्षांच्या कारभाराला नवे नेतृत्व मिळणार असून, सदस्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

हेही वाचा     :                  पावसाळ्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्ती हाताळण्यासाठी नियंत्रण व नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

नवीन कार्यकारिणीमध्ये पदवाटप दोन-तीन दिवसांत करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील सोसायटीधारकांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी फेडरेशन कटिबद्ध राहील, असा संकल्प नवनिर्वाचित सदस्यांनी केला आहे.

विजयी उमेदवारांची नावे:

सचिन लोंढे, अरुण देशमुख, सचिन गुणाले, अधिकराव दिवे- पाटील, विकास बाबर, प्रदीप घोरपडे, सचिन सिंध्ये, अजय तोडकर, रोहित सावंत, वैभव चौधरी, रोहित पाठक.

निवडणूक झाली, तरी एकसंघ काम करणार..!

सोसायटी फेडरेशनची निवडणूक बिनविरोध व्हावी. या करिता सर्व सदस्यांनी प्रयत्न केला. मात्र, ११ जागांसाठी १६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. ज्येष्ठ सदस्यांनी सर्वांना सहमतीने निवडणूक करा आणि बिनविरोध करण्याबाबत संवाद केला. त्यानंतर माजी अध्यक्ष दत्तात्रय देशमुख यांनी पुढाकार घेतला आणि स्वत:चा अर्ज माघारी घेतला. तसेच, ‘‘आपण निवडणूक बिनविरोध करु आणि सकारात्मक संदेश देवू..’’ अशी भूमिका मांडली. १६ पैकी दोन अर्ज माघारी झाले. पण, ३ अर्ज जास्तीचे असल्यामुळे निवडणूक घेणे अपरिहार्य ठरले. अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान घेण्याचा निर्णय घेतला. मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि सर्वाधिक मते मिळवलेल्या ११ विजयी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचित सदस्यांमध्ये ज्या सहकाऱ्यांना संधी मिळाली नाही. त्यांना फेडरेशनवर तज्ञ- सल्लागार सदस्यपदी नियुक्ती करण्याचे विचाराधीन आहे. फेडरेशन आणि सोसायटीधारकांचे कार्य एकजुटीने आणि सक्षमपणे करण्यात येईल. यावर उपस्थित सर्व सदस्यांचे एकमत झाले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button