ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

मास्टर माईंड ग्लोबल स्कूलची ‘शंभरी’’

शिक्षण विश्व: सीबीएसई दहावी परीक्षेत यशाची परंपरा कायम*

पिंपरी-चिंचवड : शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या ‘मास्टर माईंड ग्लोबल स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज’ने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) इयत्ता दहावीच्या निकालात यंदाही १००% यशाची मोहोर उमटवली आहे. उत्कृष्ट अध्यापन आणि नियोजनाच्या जोरावर शाळेने आपली यशाची परंपरा दिमाखात कायम राखली आहे.

हेही वाचा –  प्रतिभा इंटरनँशनल स्कुलचा १०० टक्के निकाल

​यंदाच्या परीक्षेत शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले: आर्यन पवार -९८.२०%, अवनी जाधव -९८.००%, समीक्षा पाटील -९६.६०%, क्रिषाला दळवी -९५.४०%, या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांची जिद्द, विषय शिक्षकांचे प्रभावी मार्गदर्शन आणि पालकांनी दिलेले भक्कम पाठबळ या त्रिवेणी संगमामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

​शाळेच्या या निकालामुळे परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत असून, शैक्षणिक गुणवत्ता राखण्यात मास्टर माईंड ग्लोबल स्कूलने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

​”आमच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या सातत्यपूर्ण अभ्यासाचे आणि कष्टाचे फळ आहे. केवळ शैक्षणिक प्रगतीच नव्हे, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आमचे उद्दिष्ट आहे. या यशात शिक्षक आणि पालकांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. मी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करते आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देते.”

– डॉ. प्रदीपा नायर, ​मुख्याध्यापिका.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button