ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

प्रतिभा इंटरनँशनल स्कुलचा १०० टक्के निकाल

शिक्षण विश्व: इयत्ता १० वी (सी.बी.एस.ई) बोर्ड परीक्षेत कामगिरी

पिंपरी- चिंचवड । चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा इंटरनँशनल स्कुलचा इयत्ता १०वी (सी.बी.एस.ई) बोर्ड परीक्षेत १०० टक्के निकाल लागला. शाळेत ईशान गाडेकर याने ९८.८० टक्के गुण मिळवून प्रथम आला. इंग्रजी व आयटीत १०० पैकी १०० गुण तर सामाजिक शास्त्र विषयात ९९ गुण मिळविले.

अवनी मंडोत व मनस्वी मराठे यांनी ९८ टक्के गुण मिळवून दुसऱ्या क्रमांक पटकावला. त्यांनी इंग्रजी व आयटी विषयात १०० पैकी १०० गुण मिळविले. तर निश्चल बडजाते याने ९७.८० टक्के मिळवून तिसरा आला. याने देखील आयटी व इंग्रजी १०० पैकी १०० गुण प्राप्त केले. तर पहिल्या दहामध्ये रुद्र मंचेकर, तन्वी कापसे, वेदांत सुर्वे, आरुल महिंद्रकर, रघुवीर बिरादार, अन्विता चिंचोलीकर, प्रज्ज्वल रेखावर यांनी देखील ९४.६० टक्क्यांपैकी जास्त गुण मिळवून व यश प्राप्त केले.

हेही वाचा –  प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ. प्रमोद चौधरी यांना मानद डॉक्टरेट प्रदान

या शाळेतील विद्यार्थ्याच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.दिपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ.तेजल शहा याच्या समवेत विविध शिक्षण संस्थेचे प्राचार्य , प्राचार्या व संचालकांनी प्रतिभा इंटरनँशनल स्कुलच्या प्राचार्या डॉ.वृंदा मुलतानी जोशी, उपप्राचार्या लिझा सोजू, समन्वयिका गुलनाज खान व इतर शिक्षकांचा शाळेचा शंभर टक्के निकालासाठी विशेष परिश्रम घेतल्याबद्दल कौतुक केले व उत्कृष्ट कामगिरी प्रित्त्यार्थ कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ . दीपक शहा यांनी संस्थेच्या वतीने सर्वाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button