ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आला रे आला वासुदेव आला…’; संदीप वाघेरे अन् राष्ट्रवादीच्या पॅनेलसाठी ‘कृतज्ञतेचा’ वासुदेव रिंगणात!

​बीड-बार्शीतील मदतग्रस्तांकडून अनोख्या पद्धतीने ऋणनिर्देश; पिंपरी गावात प्रचाराची मोहिनी

​पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक रणधुमाळीत प्रभाग क्रमांक २१ (पिंपरी गाव) मध्ये प्रचाराचा रंग आता अधिकच गडद झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे आणि निकिता कदम यांच्या प्रचारासाठी चक्क ‘वासुदेव’ मैदानात उतरले आहेत. संदीप वाघेरे यांनी कठीण काळात केलेल्या मदतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बीड आणि बार्शी येथून हे वासुदेव खास पिंपरीत दाखल झाले असून, त्यांच्या लोककलेने मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सांस्कृतिक वारसा आणि प्रचाराची सांगड

प्रभाग २१ मध्ये राष्ट्रवादीच्या पॅनेलचा जोरदार प्रचार सुरू आहे. ठिकठिकाणी पदयात्रा आणि भेटीगाठींवर भर दिला जात असतानाच, वासुदेवांच्या आगमनाने प्रचाराला एक सांस्कृतिक आणि भावनिक किनार लाभली आहे. “आला रे आला वासुदेव आला, ठेवू ध्यानात सारे चला… मतदान करू घड्याळाला” अशा डफ आणि टाळांच्या तालावर साद घालणाऱ्या ओळी सध्या पिंपरीच्या गल्लोगल्लीत घुमत आहेत. पहाटेच्या सुमारास आणि सायंकाळी वासुदेवाच्या सुरांनी मतदारांमध्ये कुतूहल निर्माण केले आहे.

हेही वाचा     :            रावेत, किवळेच्या विकासाचे शिल्पकार : बबनराव भोंडवे ते तानाजी भोंडवे!

​मदतीची परतफेड: बीड-बार्शीतून आले मदतीचे हात

​संदीप वाघेरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत बीड आणि बार्शी भागातील आपदग्रस्तांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची मोठी मदत केली होती. राजकारणापलीकडे जाऊन केलेल्या या कार्याची जाणीव ठेवून, तिथल्या लोककलावंतांनी स्वतःहून प्रचारात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. “साहेबांनी आम्हाला अडचणीच्या काळात आधार दिला, आज आम्ही त्यांच्यासाठी गाणी गाऊन आशीर्वाद मागायला आलो आहोत,” अशा भावना या वासुदेवांनी व्यक्त केल्या.

मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण

​प्रचाराची ही अनोखी आणि पारंपारिक पद्धत सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. लाऊडस्पीकरच्या आवाजापेक्षा वासुदेवाच्या मंजूळ सुरांनी मतदारांच्या काळजाला हात घातला आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे मतदानाची टक्केवारी वाढेल आणि लोक उत्साहाने घराबाहेर पडतील, असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला आहे.

​आम्ही केवळ विकासकामेच केली नाहीत, तर लोकांची सुख-दु:खेही आपली मानली आहेत. आज ही मंडळी प्रेमापोटी लांबून आली आहेत, हेच आमच्या कार्याचे पावती आहे.

– संदीप वाघेरे (उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस)

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button