Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

‘गडचिरोली जिल्ह्यातील रोजगार वाढीस चालना मिळणार’; मंत्री मंगल प्रभात लोढा

गडचिरोली : बदलत्या औद्योगिक व कृषी अर्थव्यवस्थेत युवकांना तात्काळ रोजगारक्षम बनविण्यासाठी अल्पमुदतीचे, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. गडचिरोली येथील क्रातीवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे राबविण्यात आलेल्या ‘ट्रॅक्टर सर्विस मेकॅनिक’ या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमातून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या २५ विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले, त्या कार्यक्रमात ते दूरदृश्य प्रणाली द्वारे बोलत होते.

हा नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रम दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडला. यावेळी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेशमुख, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, राज्य नाविन्यता सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद माळी, तसेच महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड कंपनीच्या कौशल्य विकास विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉन लुईस आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्यातील रोजगारनिर्मितीस गती मिळत असून, येत्या पाच वर्षांत हा जिल्हा राज्यातील वेगाने विकसित होणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक ठरेल, असा विश्वासही मंत्री लोढा यांनी व्यक्त केला. गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक युवकांना विकासप्रक्रियेचा थेट लाभ मिळावा, यासाठी कौशल्यविकास विभाग वेगाने काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  धान/भरडधान्य खरेदीकरिता शेतकऱ्यांच्या नोंदणी प्रकियेला ३१ जानेवारी, २०२६ पर्यंत मुदतवाढ

मंत्री लोढा पुढे म्हणाले की, गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यात युवकांना दीर्घकालीन शिक्षणाबरोबरच तात्काळ रोजगार देणारे अभ्यासक्रम आवश्यक आहेत. ‘ट्रॅक्टर सर्विस मेकॅनिक’सारखे अल्पमुदतीचे अभ्यासक्रम युवकांना थेट उद्योगाशी जोडतात. लोहखनिज व इतर औद्योगिक गुंतवणुकीमुळे गडचिरोलीत मोठ्या प्रमाणावर उद्योग उभे राहत असून, त्या पार्श्वभूमीवर कुशल मनुष्यबळ तयार करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. येथे सुरू असलेल्या मोठ्या औद्योगिक प्रकल्पांना गती देताना स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. सामान्य नागरिकाला शासनाच्या सर्व सेवा व सुविधा सहज आणि सुलभपणे मिळाव्यात, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलपणे काम करावे, असे त्यांनी नमूद केले. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी दर महिन्याला जिल्ह्याला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button