Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

धान/भरडधान्य खरेदीकरिता शेतकऱ्यांच्या नोंदणी प्रकियेला ३१ जानेवारी, २०२६ पर्यंत मुदतवाढ

मुंबई : खरीप पणन हंगाम २०२५-२६ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान/भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणी करिता ३१ जानेवारी, २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने कळविले आहे.

हेही वाचा –  ‘दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत जिल्हास्तरावर आढावा’; सचिव तुकाराम मुंढे

शेतकरी नोंदणीस देण्यात आलेल्या  मुदतवाढ कालावधीत शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करुन शेतकऱ्यांच्या नोंदणीची कार्यवाही करण्याबाबत विभागाने संबंधित यंत्रणांना सूचित केले आहे. शेतकरी नोंदणीसाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत होती,  तिला वाढ देण्याबाबत लोकप्रतिनिधीनकडून तसेच विविध स्तरावरुन मागणी होती.  त्याअनुषंगाने खरीप पणन हंगाम २०२५-२६ मध्ये धान/भरडधान्य खरेदीकरिता शेतकऱ्यांच्या नोंदणी प्रकियेला ३१ जानेवारी, २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button