Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘विद्यार्थ्यांनी नोकरी शोधणारे नव्हे, तर देणारे व्हावे’; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

मुंबई : देशाच्या प्रगतीसाठी संशोधन, तंत्रज्ञान आणि तरुण बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी नोकरी शोधणारे नव्हे, तर नोकरी निर्माण करणारे व्हावे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. आयआयटी मुंबई येथे आयोजित टेकफेस्ट २०२५ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

देशाला केवळ कुशल कर्मचारी नव्हे, तर उद्योजकांची गरज आहे. नवकल्पना, संशोधन आणि उद्योगशीलतेच्या जोरावर रोजगारनिर्मिती होऊ शकते आणि त्यातूनच भारताची आर्थिक ताकद वाढेल. टेकफेस्टच्या माध्यमातून तरुण पिढीला विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या दिशेने प्रेरणा मिळत असून, भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी हीच ऊर्जा निर्णायक ठरणार असल्याचे मत यावेळी नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला आयआयटी मुंबईचे अध्यक्ष प्रा. शिरीष केदार, माजी अध्यक्ष डॉ. शरद सराफ, प्रा. सूर्यनारायण हुल्ला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आयआयटी म्हणजे भारताची ‘ज्ञानभांडार’ आहे. सरकारच्या विविध यंत्रणांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींवर तोडगा काढण्यासाठी त्या आयआयटीकडे पाठवल्या जातात. त्यावर आयआयटीकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांना देशभरात मान्यता मिळते. ही बाब आयआयटींच्या विश्वासार्हतेचे द्योतक आहे. संशोधनातून प्रत्यक्ष वापरात येणारी उत्तरे देण्याची आयआयटींची क्षमता हीच देशाच्या प्रगतीची खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा –  ‘सर्वांगीण विकासाचा ध्यास’; तुषार सहाणे

देशाच्या भविष्यासाठी संसाधने, ज्ञान आणि तंत्रज्ञान या तिन्ही घटकांचे महत्त्व अधोरेखित करताना गडकरी यांनी, कोणत्याही राष्ट्राची क्षमता आज करण्यात येणाऱ्या संशोधन व दूरदृष्टीपूर्ण नियोजनावर अवलंबून असते, असे गडकरी यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यात संशोधन व तंत्रज्ञानाची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

ज्ञानाचे प्रत्यक्ष आर्थिक व सामाजिक मूल्यामध्ये रूपांतर झाले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. पर्यायी इंधनांच्या क्षेत्रातील सरकारी उपक्रमांची माहिती देताना गडकरी यांनी सांगितले की, भाताच्या पेंढ्यापासून जैव-बिटुमन (बायो-बिटुमन) तयार करून एक किलोमीटरचा रस्ता बांधण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अवशेषांचा उपयोग होत असून पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुढील टप्प्यात पिके व जैवकचऱ्यापासून हायड्रोजन निर्मितीवर भर दिला जात असून, हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांच्या विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. नैसर्गिक संसाधनांवर आधारित उद्योग उभारण्यात आयआयटीतील विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असेही त्यांनी नमूद केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button